‘क्राइम शो’ पाहून बहिणीला संपविले, ती रक्ताच्या थारोळ्यात पडेपर्यंत चाकूने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 03:55 IST2023-05-31T03:55:15+5:302023-05-31T03:55:27+5:30

बोरगाव मंजू पोलिसांनी आरोपी लहान बहिणीला अटक केली आहे.

After watching a crime show little sister killed her elder sister stabbed her lot of times | ‘क्राइम शो’ पाहून बहिणीला संपविले, ती रक्ताच्या थारोळ्यात पडेपर्यंत चाकूने वार

‘क्राइम शो’ पाहून बहिणीला संपविले, ती रक्ताच्या थारोळ्यात पडेपर्यंत चाकूने वार

बोरगाव मंजू (जि. अकाेला) : सख्ख्या विवाहित बहिणीवर लहान बहिणीने रागाच्या भरात चाकूने वार करून तिची हत्या केल्याची घटना खडका गावात रविवारी रात्री घडली. मोठी बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडेपर्यंत लहान बहीण तिच्यावर चाकूने वार करीत होती. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिसांनी आरोपी लहान बहिणीला अटक केली आहे.

खडका येथे विठ्ठल वसतकार हे कुटुंबासह राहतात. त्यांची मोठी विवाहित मुलगी रेश्मा (२४) ही बुलढाण्याला असते. लहानी रविना (२१) घरीच असते. गेल्या आठवड्यात रेश्मा माहेरी आली होती. दोघी बहिणी बेडरूममध्ये बोलत असताना कोण्यातरी विषयावरून त्यांच्यात वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, संतापलेल्या रविनाने धारदार चाकूने रेश्मावर वार केले. आरडाओरड ऐकून आई-वडील येईपर्यंत ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.

क्राइम शो पाहून केले कृत्य
रविना टीव्हीवर क्राइम शो पाहायची. क्राइम एपिसोडमध्ये रक्तरंजित हत्या, हल्ले पाहून रविनाच्या मनावर परिणाम झाल्याचे पाेलिसांनी केलेल्या चाैकशीत समाेर आले. दोघी बहिणींमध्ये जिवापाड प्रेम होते. अधूनमधून त्या भांडायच्यासुद्धा; मात्र गेल्या काही महिन्यांपासून रविना मानसिक तणावात होती. तिच्यावर मनोरुग्ण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Web Title: After watching a crime show little sister killed her elder sister stabbed her lot of times