पत्नीशी भांडण झाल्याने पोलीस अधिकाऱ्याने झाडली बंदुकीची गोळी अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 08:39 PM2021-04-20T20:39:30+5:302021-04-20T20:41:29+5:30

Firing : मुलगा होत नसल्याबाबत पती-पत्नीमध्ये वाद होत असल्याचा आरोप आहे. 

After a quarrel with his wife, the police officer fired a shot and ... | पत्नीशी भांडण झाल्याने पोलीस अधिकाऱ्याने झाडली बंदुकीची गोळी अन्... 

पत्नीशी भांडण झाल्याने पोलीस अधिकाऱ्याने झाडली बंदुकीची गोळी अन्... 

Next
ठळक मुद्देएडीसीपी ईस्टर्न एसएम कासिम आबिदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यादव मूळचे जौनपूरच्या हमजा येथील रहिवासी असून तो उत्तर प्रदेश पोलिसात निरीक्षक म्हणून तैनात आहे.

माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या संरक्षण ताफ्यात तैनात असलेले पोलीस निरीक्षक धर्मेंद्र यादव यांनी पत्नीशी झालेल्या वादादरम्यान आपल्या बंदुकीतून गोळी झाडली. या गोळीबारात शेजारची महिला अंशिका गुप्ता जखमी झाली. पोलिसांनी आरोपी निरीक्षकास ताब्यात घेतले. त्याची सरकारी पिस्तूलही हस्तगत केली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. मुलगा होत नसल्याबाबत पती-पत्नीमध्ये वाद होत असल्याचा आरोप आहे. 

एडीसीपी ईस्टर्न एसएम कासिम आबिदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यादव मूळचे जौनपूरच्या हमजा येथील रहिवासी असून तो उत्तर प्रदेश पोलिसात निरीक्षक म्हणून तैनात आहे. सध्या त्यांची पोस्टिंग माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या संरक्षण ताफ्यात आहे. धर्मेंद्र यादव गोमतीनगर विस्तार क्षेत्रातील खरगापूर येथे आपल्या कुटूंबासह राहतात. त्यांची पत्नी प्रियंका यादव आणि तीन मुली असा परिवार आहे. धर्मेंद्र हा सोमवारी संध्याकाळी उशिरा पत्नीशी भांडण करीत होता.

भांडणाचा आवाज ऐकून शेजारील महिला अंकिता गुप्ता यादव यांच्याकडे आली. ती वाद मिटविण्याचा प्रयत्न करीत होती. दरम्यान, संतप्त निरीक्षक धर्मेंद्र यादव यांनी गोळीबार केला. गोळी भिंतीवर आदळली आणि अंकिताच्या डाव्या खांद्यालागल्याने ती जखमी झाली.

गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे
गोळीबाराच्या आवाजाने आजूबाजूला खळबळ उडाली. धर्मेंद्रच्या घरी शेजारचे लोक आले. जखमी अंकिताला पाहून लोकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी आरोपी निरीक्षक धर्मेंद्रला ताब्यात घेतले आणि त्याच्या ताब्यातून सरकारी पिस्तूल जप्त केली. गोमती नगर विस्तार निरीक्षक पवन कुमार पटेल यांनी आरोपीला पोलिस ठाण्यात नेले. त्याचवेळी, पीडित महिलेस तक्रार देण्यास बोलावले होते.

मुलगा नसल्यामुळे पोलीस निरीक्षक संतप्त 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यादव यांना तीन मुली आहेत. मुलगा नसल्याबद्दल तो अनेकदा आपल्या पत्नीशी भांडत असे. याबद्दल बर्‍याच दिवसांपासून त्यांच्यात भांडण सुरू होते. सोमवारी संध्याकाळीही धर्मेंद्र यांनी पत्नी प्रियंकाबरोबर मुलगा नसल्याबद्दल भांडण केले, त्यानंतर या दोघांमध्ये वाद सुरू झाला. हे प्रकरण इतके वाढले की धर्मेंद्र रागावला आणि त्याने तेथून पिस्तूल काढून गोळीबार केला. पोलिस तपास करत आहेत.

पत्नीशी भांडण करून केला गोळीबार 
आरोपी निरीक्षक धर्मेंद्र कुमार यादव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून सरकारी पिस्तूलही पोलिसांनी घेतले. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, पत्नीबरोबर झालेल्या भांडणाच्या वेळी त्याने हवेत गोळीबार केला होता. मात्र, शेजारी राहणारी अंकिता जखमी झाली आणि सध्या अंकिताच्या तक्रारीच्या आधारे पोलिस गुन्हा दाखल करत आहेत. - एसएम कासिम आबिदी, एडीसीपी पूर्व

Web Title: After a quarrel with his wife, the police officer fired a shot and ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.