Video : लोकलनंतर आता लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही स्टंटबाजांचे माकडचाळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 17:50 IST2018-10-08T17:48:38+5:302018-10-08T17:50:53+5:30
ही एक्स्प्रेस हार्बर मार्गावरून शनिवारी सकाळच्या सुमारास पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जात होती.

Video : लोकलनंतर आता लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही स्टंटबाजांचे माकडचाळे
मुंबई - धावत्या लोकलमधील स्टंटनंतर आता लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये देखील जीवघेणे माकडचाळे केलेला व्हिडीओ उघडकीस आला आहे. या व्हिडीओत एक तरुण एक्सप्रेसच्या दरवाजाला लटकून स्टंट करताना दिसत आहे. ही एक्स्प्रेस हार्बर मार्गावरून शनिवारी सकाळच्या सुमारास पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जात होती.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तरुण लोकलच्या दरवाजाला लटकून विजेच्या खांबाजवळ स्टंट करताना दिसत आहे. मात्र, काही वेळानंतर मागच्या डब्यातील काही प्रवाशांनी आरडा - ओरडा केल्यावर हा तरुण स्टंट करायचे थांबवतो. गेल्या आठवड्यातच अशाच प्रकारच्या लोकल स्टंटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये लोकलच्या दरवाजात उभी असलेली एक तरुणी तोल जाऊन खाली पडता - पडता थोडक्यात बचावली होती. सध्या पोलिसांनी तिच्यावर रेल्वे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद केली आहे. याबाबत रेल्वे प्रवासी यात्री परिषदेचे सुभाष गुप्ता यांनी अशा स्टंटबाजी करणाऱ्यांविरोधात सक्त कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे. त्याचप्रमाणे मानखुर्द आणि वडाळा रेल्वे स्थानकादरम्यान अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे.