शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कोलकाता, बदलापूरनंतर आता चंदीगड...! स्कूल बस ड्रायव्हरचा 12वीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 10:03 IST

या 26 वर्षीय आरोपीचे नाव मोहम्मद रज्जाक असे आहे. तो चंदीगडमधील मनीमाजरा येथील रहिवासी आहे...

कोलकाता, बदलापूरनंतर आता चंदीगडमधूनही अत्याचाराची घटना समोर आली आहे. येथे एका मोठ्या शाळेच्या बस ड्रायव्हरला 17 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. जीरकपूर पोलिसांनी या ड्रायव्हरला बुधवारी अटक केली असून त्याने 12व्या वर्गात शिकणाऱ्या एक विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संबंधित विद्यार्थिनीला तिच्या मॉर्फ्ड फोटोच्या सहाय्याने ब्लॅकमेल करत होता. या 26 वर्षीय आरोपीचे नाव मोहम्मद रज्जाक असे आहे. तो चंदीगडमधील मनीमाजरा येथील रहिवासी आहे.

घरी जाऊन विद्यार्थिनीवर बलात्कार - 'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, रज्जाकने विद्यार्थिनीच्या घरी जाऊन मे ते जुलै दरम्यान तीन वेळा तिच्यावर बलात्कार केला.  पीडिता भयभीत झाली होती. अखेर तिने संपूर्ण प्रकार पालकांना सांगितला आणि पोलिसांत तक्रार दिली. यानंतर, जीरकपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याच्यावर आयपीसीचे कलम  376 (बलात्कार), 506 (गुन्हेगारी धमक्या) आणि POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

आधी मैत्रीचा प्रयत्न मग...-अल्पवयीन मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रज्जाक अनेक महिन्यांपासून तिचा पाठलाग करत होता आणि तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता. तिने त्याला मैत्रीसाठी नकार दिल्यानंतर, त्याने कौटुंबिक कार्यक्रमातील तिच्या फोटोसोबत छेडछाड केली आणि तिला दाखवून धमकावत होता.

18 मे रोजी संबंधित पीडित विद्यार्थीन आणि तिची बहिण घरी होते. तिचे आई-वडिल कामावर गेले होते. रज्जाक तिच्या घरी गेला आणि त्याने तिला ऐकले नाही, तर आपण आक्षेपार्ह फोटो सर्वांसोबत शेअर करू अशी धमकी दिली. त्याने पीडितेला संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. यानंतर, हा स्कूल ड्रायव्हर 6 जुलै आणि 26 जुलै असे दोन वेळा तिच्या घरी गेला आणि तिच्यावर बलात्कार केला होता. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSchoolशाळाStudentविद्यार्थीPoliceपोलिस