शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
5
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
6
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
7
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
8
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
9
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
10
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
11
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
12
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
13
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
14
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
15
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
16
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
17
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
18
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
19
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
20
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

देशाशी गद्दारी करणाऱ्याला ठाण्यातून अटक; पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात, ATS ची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 10:35 IST

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांविरुद्ध तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांविरुद्ध तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि एटीएस (दहशतवादविरोधी पथक) यांनी संयुक्तपणे एक कारवाई सुरू केली आहे. यामध्ये हरियाणाच्या युट्यूबर ज्योती मल्होत्रासह अनेकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आता एटीएसने महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानला भारताची माहिती देणाऱ्या, देशाशी गद्दारी करणाऱ्या एकाला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.  

पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात

एटीएसने तीन जणांना ताब्यात घेतलं होतं. मात्र चौकशीनंतर त्यापैकी दोघांना सोडण्यात आलं आहे. एटीएस एका आरोपीची सखोल चौकशी करत आहे. ठाण्यातील कळवा येथील एक व्यक्ती फेसबुकद्वारे एका पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात होता. एटीएसच्या तपासात असं समोर आलं आहे की, हा व्यक्ती नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ पर्यंत फेसबुकद्वारे पाकिस्तानी महिलेच्या संपर्कात होता आणि त्याने व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानला अनेक ठिकाणची महत्त्वाची माहिती आणि फोटो पाठवले होते.

"पप्पा, तुम्ही खंबीर राहा, मी बेकायदेशीर काम केलेलं नाही"; जेलमध्ये काय म्हणाली ज्योती मल्होत्रा?

देशभरात शोध सुरू

ऑपरेशन सिंदूरनंतर भारतात राहून पाकिस्तानला मदत करणाऱ्या गद्दार लोकांचा शोध सुरू करण्यात आला आहे. देशभरात संशयितांना अटक केली जात आहे.  कळवा येथील एक व्यक्ती पाकिस्तानमधील काही लोकांच्या संपर्कात असल्याची एटीएसला माहिती मिळाली होती. त्यानुसार एटीएसने एका ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केली. त्याला मदत करणाऱ्या त्याच्या दोन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं.

 पाकिस्तानात फिरताना ज्योतीच्या आजुबाजुला AK-47 घेऊन ६ गनर्स, Video ने उलगडलं रहस्य

ज्योतीने मोबाईलमधून डिलीट केलेला डेटा रिकव्हर; पोलिसांना मिळाले अनेक महत्त्वाचे पुरावे

दोघांना चौकशीनंतर सोडलं

एटीएसने ठाण्यात ही कारवाई केली. आरोपींसह ताब्यात घेतलेल्या दोघांना चौकशीनंतर सोडण्यात आलं. मात्र गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाईल. अटक करण्यात आलेला व्यक्ती मुंबईतील एका महत्त्वाच्या संस्थेत काम करत असल्याचं सांगितलं जात आहे. एटीएस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. यात आणखी लोकांचा सहभाग आहे की नाही याचा तपास केला जात आहे. 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानCrime Newsगुन्हेगारीAnti Terrorist SquadएटीएसOperation Sindoorऑपरेशन सिंदूरthaneठाणे