ब्रेक - अप झाल्याने प्रेयसीवर हल्ला करून तरुणाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 20:27 IST2018-10-17T20:27:11+5:302018-10-17T20:27:36+5:30
वसई - प्रेयसीवर हल्ला करून आत्महत्येच्या प्रयत्न करणाऱ्या नायगावमधील तरुणाचा बुधवारी मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तो रुग्णालयात मृत्यूशी झुंज ...

ब्रेक - अप झाल्याने प्रेयसीवर हल्ला करून तरुणाची आत्महत्या
वसई - प्रेयसीवर हल्ला करून आत्महत्येच्या प्रयत्न करणाऱ्या नायगावमधील तरुणाचा बुधवारी मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तो रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. नायगावच्या दरपाळे गावात हर्षल ठाकूर (वय २६) हा तरुण राहत होता. त्याचे मूळगाव येथील २१ वर्षीय तरुणीवर प्रेम होते. मात्र, मुलीने प्रेमसंबध तोडल्याने तो वैफल्यग्रस्त झाला होता. १० ऑक्टोबर रोजी हर्षलने या तरुणीला आपल्या घरी भेटायला बोलावले. त्यावेळी दोघामध्ये वाद झाला. हर्षलने तिच्या गळ्यावर चाकूने वार केले आणि स्वत:ला गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांनी दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तरुणीवर वेळीच उपचार मिळाल्याने ती बचावली. तसेच हर्षलला पुढील उपचारासाठी मुंबईच्या जी. टी. रूग्णालयात दाखल कऱण्यात आले होते. उपचारादरम्यान बुधवारी सकाळी हर्षलचा मृत्यू झाला, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर टिळेकर यांनी दिली. वसई पोलीस ठाणे याप्रकऱणाचा तपास करत आहेत.