शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

जामिनवर सुटताच आरोपीचा १६ वर्षीय मुलीवर परत अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 18:56 IST

आरोपीने काही महिन्यापूर्वी तक्रारदार मुलीवर अत्याचार केला होता.

ठळक मुद्देआरोपीला न्यायालयाने सशर्त जामीन दिल्यापासून तो जेलमधून बाहेर आला आहे.

औरंगाबाद: बलात्काराच्या गुन्ह्यात जामीनावर असलेल्या नराधमाने तक्रारदार १६ वर्षीय तरूणीचे अपहरण करून निर्जनस्थळी नेल्यानंतर पुन्हा अत्याचार केल्याची खळबळजनक घटना छावणी परिसरात ६ आॅक्टोबर रोजी रात्री घडली. याविषयी पीडितेची तक्रार प्राप्त होताच छावणी पोलिसांनी झटपट कारवाई करीत आरोपी नराधमाला बेड्या ठोकल्या.

सागर सुनील श्रीसुंदर (रा.शांतीपुरा, छावणी परिसर)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. छावणी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार १६ वर्षीय तरूणी ६ आॅक्टोबर रोजी सायंकाळी प्रार्थनास्थळी गेली होती. तेथील प्रार्थना आटोपल्यांनतर रात्री ७ वाजेच्या सुमारास ती पायी घरी जात होती. येथील एका  चौकात रिक्षा घेऊन आलेल्या सागरने तिला गाठले आणि शिवीगाळ व मारहाण करीत बळजबरीने रिक्षात बसविले.  यानंतर आरोपीच्या सांगण्यावरून रिक्षाचालकाने  त्यांना कब्रस्थान रस्त्यावर नेऊन सोडले आणि रिक्षासह चालक तेथून निघून गेला. कब्रस्थान निर्जनस्थळ असल्याचे पाहून आरोपी तिला ओढतच तेथे घेऊन गेला. पीडिता आरडाओरड करून आरोपीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र तो तिला बेदम मारहाण करीत होता. निर्जनस्थळ असल्याने कोणाच्याही कानावर  तिचा आवाज  पडला नाही.  जीवे मारण्याची धमकी देत त्याने ओढणीने तिचे दोन्ही हात बांधून  तिच्यावर अत्याचार केला.  रात्री दहा वाजेच्या सुमारास तिने नराधमच्या तावडीतून स्वत:ची कशीबशी सुटका करून घेतली. यानंतर थेट घरी जाऊन घडलेल्या अत्याचाराची माहिती तिने रडतच आईला सांगितली. याप्रकारामुळे पीडिता आणि तिच्या कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला.

पोलिसांत नोंदविली तक्रारया प्रकारानंतर आरोपीला न घाबरता पीडितेला घेऊन तिचे आई-बाबा दुसऱ्या दिवशी सकाळी छावणी पोलीस ठाण्यात गेले . पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सागरविरोधात विविध कलमानुसार गुन्हा नोंदवून त्याला बेड्या ठोकल्या. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस  निरीक्षक मनोज पगारे यांनी दिली.

जामीनवर सुटल्यानंतर पुन्हा अत्याचारआरोपी सागर  याने काही महिन्यापूर्वी तक्रारदार मुलीवर अत्याचार केला होता. याप्रकरणी छावणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक  केली होती. त्या केसमध्ये आरोपीला न्यायालयाने सशर्त जामीन दिल्यापासून तो जेलमधून  बाहेर  आला आहे.  दरम्यान आरोपीने  ६ रोजी पुन्हा पीडितेवर अत्याचार केल्याचे पो.नि. पगारे यांनी सांगितले.