मुलगा बनून मुलीने तरुणीलाच अडकवलं प्रेमात; शारिरीक संबंधही ठेवला, अखेर सत्य समजलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 10:11 AM2021-05-12T10:11:06+5:302021-05-12T10:11:21+5:30

25 वर्षांच्या मुलीने फेसबुकवर मुलाच्या नावाने बनावट फेक अकाऊंट तयार केले.

After becoming a boy, the girl fell in love with the another girl in london | मुलगा बनून मुलीने तरुणीलाच अडकवलं प्रेमात; शारिरीक संबंधही ठेवला, अखेर सत्य समजलं अन्...

मुलगा बनून मुलीने तरुणीलाच अडकवलं प्रेमात; शारिरीक संबंधही ठेवला, अखेर सत्य समजलं अन्...

googlenewsNext

लंडनमधील एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एक मुलगी मुलगा बनून दुसर्‍या मुलीशी मैत्री केली आणि दहा वेळा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र काही दिवसांनंतर जेव्हा मुलीला हे समजते की, तिच्याशी संबंध ठेवत असलेला बॉयफ्रेंड मुलगा नसून मुलगीच आहे, तेव्हा पीडित तरुणीला मोठा धक्काच बसतो. यानंतर पीडित तरुणीने तात्काळ स्थानिक पोलीस स्थानकात धाव घेत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन संबंधित आरोपीला ताब्यात घेतले. 

मिळालेल्या माहितीनुसार न्यूलैंड नावाच्या 25 वर्षांच्या मुलीने सोशल मीडियावर मुलाच्या नावाने बनावट फेक अकाऊंट तयार केले. काही दिवसांतच न्यूलैंडची फेसबुक अकाऊंटवर एका तरुण मुलीशी मैत्री झाली. न्यूलैंड तिच्याबरोबर फक्त एक मुलगा म्हणून फेसबुकवर बोलत होती.

एकमेकांना भेटताना देखील न्यूलैंड मुलगा बनून त्या मुलीला भेटत होती. जेव्हा दोघांमध्ये जवळचे नाते निर्माण झाले होते, तेव्हा त्यांनी शारीरिक संबंध ठेवण्यास देखील सहमती दर्शविली. तसेच घरी कोणी नसल्यावर त्या दोघी शारीरिक संबंध ठेवत  होते. परंतु तोपर्यंत पीडित तरुणीला हे समजले देखील नव्हते की न्यूलैंड देखील एक मुलगी आहे. 

न्यूलैंड जेव्हा त्या मुलीसोबत संबंध ठेवायची तेव्हा ती सेक्स टॉयचा वापर करत असत, अशी माहिती पोलिसांना सांगितली. न्यूलैंडने संबंधित पीडित मुलीसोबत तब्बल 10 वेळा शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा त्या मुलीला न्यूलैंडबद्दल खरं सत्य समजलं तेव्हा पोलीस स्थानकात धाव घेतली आणि न्यूलैंड विरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर कोर्टाने न्यूलैंडला 8 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
 

Web Title: After becoming a boy, the girl fell in love with the another girl in london

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.