अभिनेत्री हिना पांचालची कारागृहात रवानगी, इगतपुरी रेव्ह पार्टीत ड्रग्सचे सेवन भोवले 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 12:17 PM2021-07-08T12:17:35+5:302021-07-08T12:18:42+5:30

नाशिक ग्रामीण पोलिसांनी इगतपुरीत केलेल्या कारवाईत बॉलिवुड, टीव्ही कलाकार व मालिकांमध्ये काम करणाऱ्या एकूण २२ तरुण तरुणींकडून अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळले होते.

Actress Heena Panchal sent to jail, drugged at Igatpuri rev party | अभिनेत्री हिना पांचालची कारागृहात रवानगी, इगतपुरी रेव्ह पार्टीत ड्रग्सचे सेवन भोवले 

अभिनेत्री हिना पांचालची कारागृहात रवानगी, इगतपुरी रेव्ह पार्टीत ड्रग्सचे सेवन भोवले 

Next

नाशिक : जिल्ह्यातील निसर्गरम्य अशा इगतपुरी तालुक्यात दोन आलिशान बंगल्यात मागील आठवड्यात अंमली पदार्थांचे सेवनासह रंगलेली हवाइयन रेव्ह पार्टी नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून उधळून लावली होती. या गुन्ह्यात पोलिसांच्या हाती लागलेल्या बॉलिवूड अभिनेत्री हिना पांचालसह सर्व २५ संशयितांना बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. या संशयितांची रवानगी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. 

नाशिक ग्रामीण पोलिसांनी इगतपुरीत केलेल्या कारवाईत बॉलिवुड, टीव्ही कलाकार व मालिकांमध्ये काम करणाऱ्या एकूण २२ तरुण तरुणींकडून अंमली पदार्थांचे सेवन केल्याचे आढळले होते.

या छाप्यात पोलिसांनी अभिनेत्री हिना पांचालसह एकूण २२ संशयितांना स्काय ताज, स्काय व्हिला या बंगल्यांमधून रंगेहाथ ताब्यात घेतले होते. यानंतर या गुन्ह्यात नायजेरियन ड्रग्ज विक्री करणारा नायजेरियन पीटर उमाही देखील पोलिसांच्या हाती लागला. एकूण संशयितांची संख्या २७ वर पोहचली. त्यापैकी २५ संशयितांना अटक केली होती.
 

Web Title: Actress Heena Panchal sent to jail, drugged at Igatpuri rev party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.