अंगावर पाणी उडालं म्हणून अभिनेत्रीच्या गाडीचा फोडला आरसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 19:56 IST2018-08-13T19:55:28+5:302018-08-13T19:56:16+5:30

याबाबत वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. 

actress-got-attacked-on-rear-mirror-of-her-car due to flash the pothole water | अंगावर पाणी उडालं म्हणून अभिनेत्रीच्या गाडीचा फोडला आरसा

अंगावर पाणी उडालं म्हणून अभिनेत्रीच्या गाडीचा फोडला आरसा

मुंबई - गेल्या आठवड्यात अभिनेत्री रुपाली गांगुली हिच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता अजून एका अभिनेत्रीच्या गाडीवर हल्ला झाला आहे. अंगावर पाणी उडालं म्हणून अभिनेत्रीच्या गाडीवर हल्ला करत गाडीचा आरसा तोडण्यात आला आहे. याबाबत वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. 

सुशील जांगिरा असं या अभिनेत्रीचं नाव असून शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अंधेरी येथे ही घटना घडली. अंधेरीत असलेल्या आयएमपीपीए इमारतीबाहेर सुशील गाडी घेऊन आली. त्यावेळी मागून बाईकने येणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाने तिच्या गाडीच्या खिडकीच्या काचेवर हाताने मारायला सुरुवात केली. काच खाली करून तिने त्याला कारण विचारलं असता, त्याने स्वतःच्या भिजलेल्या पँटकडे बोट दाखवलं. पावसाच्या दिवसात रस्त्यातील खड्ड्यांमधलं साचलेलं पाणी त्याच्या अंगावर उडाल्यामुळे तो तरुण संतापला होता. त्याने रागाच्या भरात सुशीलच्या गाडीचा आरसा फोडला आणि त्याने तिथून पाल काढला. या घटनेनंतर घाबरलेल्या सुशीलने वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. मी जाणून बुजून त्याच्या अंगावर पाणी उडवलं नसून मी गाडी चालवण्यात व्यग्र होते. तरीही त्याने माझ्या गाडीचा आरसा फोडला. सुदैवाने मी गाडीतून खाली उतरले नाही नाहीतर त्याने माझ्यावरही हल्ला केला असता असे सुशीलने पोलिसांकडे स्पष्ट केले. 

Web Title: actress-got-attacked-on-rear-mirror-of-her-car due to flash the pothole water