गर्भपात करायला लावला, आता जीवालाही धोका; तमिळ अभिनेत्रीचे माजी मंत्र्यावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 23:33 IST2021-05-29T23:32:31+5:302021-05-29T23:33:47+5:30
नेत्यावर जीवे मारण्याची धमकी देण्याचे आणि ब्लॅकमेल करण्याचेही अभिनेत्रीनं केले आरोप.

गर्भपात करायला लावला, आता जीवालाही धोका; तमिळ अभिनेत्रीचे माजी मंत्र्यावर गंभीर आरोप
दक्षिण भारतीय चित्रपटातील अभिनेत्री चांदनी हिनं ऑल इंडिया अन्ना द्रविड मुन्नेत्र कडगमचे (AIADMK) माजी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री एम. मणिकंदन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्री चांदनीनं मणिकंदन यांच्यावर धोका देण्याचे, ब्लॅकमेल करणं आणि खासगी फोटो लीक करण्याची धमकी देण्यासारखे गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर लग्नाचं आमिष दाखवून त्यांना शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि आपण गर्भवती झाल्यानंतर त्यांनी गर्भपात करण्यास भाग पाडलं. आता आपल्या जिवाला धोका असल्याचंही अभिनेत्रीचं म्हणणं आहे.
अभिनेत्रीनं आपले चॅट, दस्तऐवज आणि काही फोटो दाखवत दोघांचे संबंध असल्याचे आपल्याकडे पुरावे आहेत असा दावा केला आहे. त्यांनी चेन्नई पोलीस आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रारही केली आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर चित्रपट क्षेत्रापासून राजकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. सध्या एम. मणिकंदन यांनी यावर कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
समोर आलेल्या वृत्तानुसार मणिकंदन आणि अभिनेत्री चांदनी यांची ओळख पहिल्यांदा मलेशियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या कामादरम्यान झाली होती. २०१९ मध्ये मणिकंदन यांचा तामिळनाडूच्या मंत्रिमंडळातून मुक्त करण्यात आलं होतं. त्यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या मंत्रीपदाची जबाबदारी होती.