चेक बाऊन्सप्रकरणी अभिनेता राजपाल यादवला ३ महिन्यांचा कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 20:10 IST2018-11-30T20:03:36+5:302018-11-30T20:10:08+5:30
२०१० साली राजपाल याने इंदौर येथील सुरेंद्र सिंह या व्यक्तीकडून ५ कोटी रुपये कर्ज म्हणून घेतले होते. तसेच काही दिवसात पैसे परत करतो असे आश्वासनही त्याने सिंह यांना दिले होते.

चेक बाऊन्सप्रकरणी अभिनेता राजपाल यादवला ३ महिन्यांचा कारावास
नवी दिल्ली - चेक बाऊन्सप्रकरणी बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव याला ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
२०१० साली राजपाल याने इंदौर येथील सुरेंद्र सिंह या व्यक्तीकडून ५ कोटी रुपये कर्ज म्हणून घेतले होते. तसेच काही दिवसात पैसे परत करतो असे आश्वासनही त्याने सिंह यांना दिले होते. मात्र, दिलेली मुदतीत यादव पैसे परत करत नसल्याने सिंह यांनी यादवच्या मागे तगादा लावला होता. यामुळे 2015 साली यादव याने मुंबईतील अॅक्सिस बँकेचा एक चेक सिंह यांना दिला. पण तो चेक बाऊन्स झाला. यामुळे सिंह यांनी वकीलाकडून यादव याला नोटीस पाठवली. तरी देखील यादव याने कर्ज फेडले नाही. यामुळे सिंह यांनी येथील जिल्हा न्यायालयात खटला दाखल केला. न्यायालयाने सिंह व यादव यांना सामंजस्याने हा वाद सोडवण्याचा अनेकदा सूचना दिल्या. मात्र, यादवने गंभीरपणे न घेता सिंह यांचे कर्ज फेडलेच नाही. यामुळे त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली.
चेक बाऊन्सप्रकरणी बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव याला तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) November 30, 2018