Breaking : वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 19:43 IST2020-04-18T19:41:04+5:302020-04-18T19:43:25+5:30

एजाज खानने केलेल्या फेसबुक लाईव्ह व्हिडिओत वादग्रस्त वक्तव्य केले होते.

Actor Ejaz Khan arrested by khar police for making controversial comments pda | Breaking : वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक

Breaking : वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक

ठळक मुद्देखार पोलिसांनी भा. दं. वि. कलम १५३ - अ, १२१, ११७, १८८, ५०१, ५०४ आणि ५०५(२) अन्वये गुन्हा करून त्याला अटक केली आहे.  कायम वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहणारा अभिनेता एजाज खान याला अटक करा या मागणीने सोशल मीडियावर जोर धरला आहे.

मुंबई - मुंबईपोलिसांच्या खार पोलिसांनी आज सायंकाळी अभिनेता एजाज खानला वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी अटक केली आहे. एजाज खानने केलेल्या फेसबुक लाईव्ह व्हिडिओत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर खार पोलिसांनी भा. दं. वि. कलम १५३ - अ, १२१, ११७, १८८, ५०१, ५०४ आणि ५०५(२) अन्वये गुन्हा करून त्याला अटक केली आहे. 

कायम वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहणारा अभिनेता एजाज खान याला अटक करा या मागणीने सोशल मीडियावर जोर धरला आहे. देशात काहीही झालं तरीदेखील मुस्लीम नागरिकांना दोषी धरतात, असं वादग्रस्त वक्तव्य एजाज खानने केलं होतं. त्याने फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करत त्याचं मत मांडलं होतं. मात्र त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल करत अटक करण्याची मागणी केली आहे. इतकंच नाही तर ‘#अरेस्ट_एजाज_खान’ हा हॅशटॅगही ट्रेण्ड झाला होता.

Web Title: Actor Ejaz Khan arrested by khar police for making controversial comments pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.