अभिनेता ब्रम्हा मिश्रा अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 17:01 IST2021-12-02T16:47:32+5:302021-12-02T17:01:40+5:30
Actor Brahma Mishra Died :अभिनेता ब्रम्हा मिश्रा याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. त्यांचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह राहत्या घरातून ताब्यात घेत वर्सोवा पोलिसांनी शवविच्छेदनासाठी कुपर रुग्णालयात पाठविला आहे.

अभिनेता ब्रम्हा मिश्रा अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
मुंबई - मिर्झापुर या वेबसीरिजमध्ये काम करणारा अभिनेता ब्रम्हा मिश्रा याचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. त्यांचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह राहत्या घरातून ताब्यात घेत वर्सोवा पोलिसांनी शवविच्छेदनासाठी कुपर रुग्णालयात पाठविला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
यारी रोडवरील एका इमारतीत ब्रम्हा मिश्रा भाड्याने राहत होता. मिर्झापूर या वेबसीरिजमध्ये मुन्ना भैय्याचा खास मित्र ललितची भूमिका साकारणाऱ्या ब्रम्हा मिश्रा यांचे निधन झाले आहे. २९ नोव्हेंबर रोजी छातीत दुखू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना ऍसिडीटीचे औषध देऊन घरी पाठवले. मात्र घरीच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले अशी चर्चा आहे. वेदनादायक बाब म्हणजे त्यांचा मृतदेह तीन दिवस मुंबईच्या यारी रोड वर्सोवा येथील घराच्या बाथरूममध्ये पडून होता. सध्या वर्सोवा पोलीस घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून मृत्यूची नेमकी वेळ आणि कारण हे त्याचा अहवाल आल्यानंतर कळू शकेल, अशी माहिती दैनिक भास्करने दिली आहे. तसेच अधिक तपास सुरू असल्याचे वर्सोवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिराज इनामदार यांनीसांगितले.
ब्रह्मा हा अभिनेता भोपाळचा रहिवासी होता
भोपाळ रायसेनचे रहिवासी असलेला ब्रम्हा मिश्रा हा ३२ वर्षांचा होता. रायसेनमध्येच त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याचे वडील जमीन विकास बँकेत कामाला होते. मिर्झापूरशिवाय ब्रह्माने केसरी, हसीन दिलरुबा, मांझी, बद्रीनाथ की दुल्हनिया या चित्रपटांमध्येही काम केले होते.
शेवटचा चित्रपट या वर्षी आला होता
ब्रह्माने २०१३ मध्ये चोर चोर सुपर चोर या चित्रपटातून पदार्पण केले होते. २०२१ मध्ये तापसी पन्नू विरुद्धचा 'हसीन दिलरुबा' हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. मुंबईत सुरु असलेल्या करियरच्या संघर्षादरम्यान त्याला कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागला नाही कारण त्यांचे वडील आणि मोठा भाऊ संदीप यांनी त्याला साथ दिली होती.