शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; महिलेचे लाखो रुपये पळविणाऱ्या चोरट्यांना बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 9:05 PM

कुपर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेचे १ लाख रुपये पळवणाऱ्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या

ठळक मुद्देया दोन्ही चोरट्यांना पुढील कारवाईसाठी जुहू पोलिसांच्या ताब्यात दिले असता गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. कुपर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील १ लाख रुपये पळवणाऱ्या २ चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

मुंबई - कुपर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील १ लाख रुपये पळवणाऱ्या २ चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही उत्तम कामगिरी सहार वाहतूक पोलिसांनी केली. या दोन्ही चोरट्यांना पुढील कारवाईसाठी जुहू पोलिसांच्या ताब्यात दिले असता गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या चोरट्यांचा फरार झालेल्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. खार पूर्व परिसरात राहणारी रेखा मनोज सांसी (२८) ही दीर अजय सांसी यांच्यासोबत त्वचेच्या उपचारासाठी कुपर रुग्णालयात आली होती. घरात कोणी नसल्याने रेखाने भिशीचे १ लाख रुपये सोबत घेतले. दोघेही रुग्णालयाच्या गेटसमोर रिक्षातून उतरले. रिक्षावाल्याला पैसे देत असताना चोरट्यांची नजर रेखाच्या पर्सवर गेली. रेखा रुग्णालयाच्या गेटच्या आत जाताच पाठीमागून आलेल्या चोरट्याने तिची पर्स खेचली. प्रसंगावधान राखून रेखाने पर्स स्वत:च्या जवळ खेचली. मात्र पर्सची चेन उघडी असल्याने त्यातील १ लाख रुपये ठेवलेली पिशवी चोरट्यांनी पळवली. त्यावेळी रेखाने आरडाओरड करताच तिचा दीर अजय मदतीसाठी धावला. पिशवी घेऊन चोरटे रिक्षात बसून अंधेरीच्या दिशेने सुसाट निघाले. त्यावेळी अजय व रेखा दुसऱ्या रिक्षात बसले आणि चोरट्यांच्या रिक्षाचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, चकाला सिंग्नल येथे चोरट्यांची रिक्षा थांबली. अजय व रेखा यांनी चोरट्यांच्या रिक्षाजवळ जाऊन मदतीसाठी आरडाओरड केली. रेखाचा आवाज कानी पडताच कर्तव्यावर असलेले सहार वाहतूक पोलीस विभागाचे हवालदार प्रकाश कुंभारे व पोलीस शिपाई रमाकांत बडगुजर हे मदतीसाठी धावून आले. त्यावेळी जमलेल्या गर्दीचा फायदा घेऊन एका चोरट्याने पळ काढला. मात्र मोहम्मद नजीगुल खलीलरुल रेहमान हक (३२) व समीउल्ला सय्यद शेख (६५) यांच्या हवालदार कुंभारे, पोलीस शिपाई बडगुजर यांनी मुसक्या आवळल्या.या दोन्ही चोरट्यांना वाहतूक पोलिसांनी अंधेरी पोलीस ठाण्यात आणले. सदर माहिती जुहू पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणू जुहू पोलिसांनी भा. दं. वि.  कलम 394, 34 नुसार गुन्हा दाखल करून दोन्ही चोरट्यांना अटक केली. या चोरट्यांकडून चोरलेले १ लाख रुपये जप्त करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.या उत्तम कामगिरीबद्दल सहार वाहतूक पोलीस शाखेचे हवालदर प्रकाश कुंभारे आणि पोलीस शिपाई रमाकांत बडगुजर यांचे सांसी कुटुंबीयांनी आभार मानले. या कामगिरीबद्दल सहार वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पवार यांनी हवालदार कुंभारे व पोलीस शिपाई बडगुजर यांची प्रशंसा केली. 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिसRobberyचोरीhospitalहॉस्पिटलArrestअटक