उल्हासनगरातील चांदणी बार सील; महापालिका, मध्यवर्ती पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 22:23 IST2021-12-30T22:22:16+5:302021-12-30T22:23:01+5:30
Chandni Bar Seal : उल्हासनगर १७ सेक्शन चौक परिसरात हॉटेल फैमिली पॉईंट बार अँड रेस्टॉरंट (चांदणी बार) मध्ये परवानगीच्या अटी शर्तीचे उल्लंघन करणे. कोविड-१९ संदर्भात शासनाने काढलेल्या परिपत्रकाचे भविष्यात उल्लंघन होऊ नये म्हणून गुरवारी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान मध्यवर्ती पोलीस व महापालिकेचे सहायक आयुक्त अजित गोवारी यांच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई करीत चांदणी बार सील केले.

उल्हासनगरातील चांदणी बार सील; महापालिका, मध्यवर्ती पोलिसांची कारवाई
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-३, १७ सेक्शन परिसरसातील चांदणी बार कोरोना नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे सांगून महापालिका व मध्यवर्ती पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करीत बार सील करण्यात आला. अशी माहिती सहायक आयुक्त अजित गोवारी यांनी दिली असून यापूर्वीही चांदणी बारवर कारवाई झाली होती.
उल्हासनगर १७ सेक्शन चौक परिसरात हॉटेल फैमिली पॉईंट बार अँड रेस्टॉरंट (चांदणी बार) मध्ये परवानगीच्या अटी शर्तीचे उल्लंघन करणे. कोविड-१९ संदर्भात शासनाने काढलेल्या परिपत्रकाचे भविष्यात उल्लंघन होऊ नये म्हणून गुरवारी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान मध्यवर्ती पोलीस व महापालिकेचे सहायक आयुक्त अजित गोवारी यांच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई करीत चांदणी बार सील केले. अशी माहिती गोवारी यांनी दिली. १० ऑक्टोबर रोजी बार मध्ये हॉटेल व्यवस्थपक, महिला व पुरुष वेटर, शिपाई असे एकून १७ महिला व १३ पुरुष पोलिसांना मिळून आल्यावर गुन्हा दाखल झाला होता. अशी माहितीही गोवारी यांनी पत्रकारांना दिली. शहरातील हॉटेल, बार आदींवर पोलीस व महापालिकेला वॉच राहणार असल्याचे संकेत पोलीस अधिकाऱ्यांनी दिले.