अश्लील चाळे करणाऱ्या ११ बारबालांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 12:16 IST2022-11-23T12:15:28+5:302022-11-23T12:16:10+5:30

भिवंडी तालुक्यातील सरवली, ठाकूरपाडा येथे मुंबई - नाशिक महामार्गावर हॉटेल शेरे पंजाबच्या नावाखाली लवली नावाचा आर्केस्टा बार आहे.

Action against 11 BarBala who committed obscene act | अश्लील चाळे करणाऱ्या ११ बारबालांवर कारवाई

अश्लील चाळे करणाऱ्या ११ बारबालांवर कारवाई

भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर लवली ऑर्केस्ट्रा बारमध्ये ग्राहकांशी अश्लील चाळे करत असताना भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. या छापेमारीत ११ बारबालांसह  बारचालक, मॅनेजर, कॅशियर, वेटर अशा एकूण १६ जणांविरोधात कोनगाव पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले.  

भिवंडी तालुक्यातील सरवली, ठाकूरपाडा येथे मुंबई - नाशिक महामार्गावर हॉटेल शेरे पंजाबच्या नावाखाली लवली नावाचा आर्केस्टा बार आहे. येथे आर्केस्टा बारच्या नावाखाली शासनाच्या नियमांची पायमल्ली करून क्षमतेपेक्षा अधिक बारबाला उशिरापर्यंत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तोकड्या कपड्यावर अश्लील हावभाव करत असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा बारवर छापा टाकला. 

त्यावेळी बारमधील ग्राहकांसमोर तोकड्या कपडयावर बारबाला अश्लील चाळे करीत बीभत्स वर्तन करत असल्याचे पथकाला आढळून आले. त्यानंतर सर्वांना ताब्यात घेऊन पंचनामा करत बारचालक महिंदर तेजसिंग, मॅनेजर उमेश शेट्टी, कॅशियर दविंदर कुमार यांच्यासह दोन वेटर आणि ११ बारबालांना ताब्यात घेण्यात आले. भिवंडी गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी सचिन जाधव यांच्या तक्रारीवरून कोनगाव पोलिस ठाण्यात १६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Action against 11 BarBala who committed obscene act