पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणावर अॅसिड हल्ला, पोलिसांवरही केला गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 23:12 IST2019-04-16T23:12:38+5:302019-04-16T23:12:55+5:30
सदाशिव पेठेतील टिळक रोडलगतच्या गल्लीत उभ्या असलेल्या तरुणावर एकाने अॅसिड हल्ला करण्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजता घडला

पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणावर अॅसिड हल्ला, पोलिसांवरही केला गोळीबार
पुणे - सदाशिव पेठेतील टिळक रोडलगतच्या गल्लीत उभ्या असलेल्या तरुणावर एकाने अॅसिड हल्ला करण्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी रात्री पावणे नऊ वाजता घडला असून त्यानंतर दुस-याने त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. रोहित विजय थोरात (वय २५, रा़ सदाशिव पेठ) असे या तरुणाचे नाव आहे़ या अॅसिड हल्ल्यात त्याचा चेहरा आणि मान भाजली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, रोहित याची आई ज्योतिष विशारद असून तो लॉचा विद्यार्थी .हे़ त्याच्या आईने एका तरुणाविरुद्ध तक्रार दिली होती. त्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे़ रोहित हा टिळक रोडवरील बादशाही लॉजलगतच्या बोळात रात्री मैत्रिणी समवेत बोलत थांबला होता. यावेळी दोघे जण तेथे आले. त्यांच्यातील एकाने रोहितच्या अंगावर अॅसिड फेकले. ते त्यांच्या चेह-यावर व मानेवर पडल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याच्या साथीदाराने त्याच्या दिशेने गोळीबार केला व तो स्वप्नगंध अपार्टमेंटमध्ये पळाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी थोरात याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविले. त्याचवेळी गोळीबार करण्यासाठी तो गेलेल्या इमारतीमध्ये पोलिसांनी जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यामुळे पोलीस पुन्हा मागे आले. आरोपी हा इमारतीच्या डक्टमध्ये उतरला़ उतरताना त्याच्या डोक्याला मार लागल्याचे समजते. अंधार असल्याने त्याला पकडण्यात अडथळा येत आहे. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहेत. या घटनेची माहिती समजल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर जमाव जमला आहे. दरम्यान, हा सर्व प्रकार पे्रमप्रकरणातून झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.