वहिनीच्या चेहऱ्यावर दिरानेच फेकले ॲसिड, घाटकोपरमधील घटना, दुकान मालकही जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 11:14 IST2021-07-10T11:13:08+5:302021-07-10T11:14:03+5:30
जखमी महिलेवर जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कांबळे याच्या घराशेजारी सुदांशू प्रमाणिक यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. महिलेने नोकरीबाबत विचारताच सुदांशू यांनी तिला कामावर ठेवले.

वहिनीच्या चेहऱ्यावर दिरानेच फेकले ॲसिड, घाटकोपरमधील घटना, दुकान मालकही जखमी
मुंबई: शेजारी असलेल्या दुकानात कामाला गेल्याच्या रागातून दिरानेच आपल्या विधवा वहिनीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्याचा प्रकार घाटकोपरमध्ये गुरूवारी रात्री घडला. याप्रकरणी घाटकोपरपोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपी प्रबुद्ध कांबळे (४०) याला अटक केली आहे.
जखमी महिलेवर जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कांबळे याच्या घराशेजारी सुदांशू प्रमाणिक यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. महिलेने नोकरीबाबत विचारताच सुदांशू यांनी तिला कामावर ठेवले. मात्र, त्यांच्या दुकानात काम करण्यास कांबळेचा विरोध होता. तरीदेखील आपली वहिनी तेथे कामावर गेल्याच्या रागातून ५ जुलै रोजी त्यांच्यात वाद झाला.
यावेळी रागाच्या भरात त्याने घरातील शौचालय साफ करण्यासाठी वापरले जाणारे ॲसिड वहिनीच्या चेहऱ्यावर फेकले. यावेळी दुकानदाराने बचावासाठी मध्यस्थी केली असता, तेही यात जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुकानमालकाचे हात आणि चेहरा भाजला असून, महिलेच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.