जागेच्या वादातून अॅसिड हल्ला, तीघेजण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 21:50 IST2020-11-05T21:49:25+5:302020-11-05T21:50:05+5:30
Acid Attack : टिंकूने तीच्या अंगावर अॅसिड टाकले यात मोहजबीन 15टक्के भाजली आहे

जागेच्या वादातून अॅसिड हल्ला, तीघेजण जखमी
कल्याण: जागेच्या वादातून झालेल्या हाणामारी दरम्यान अॅसिड हल्ला झाल्याने यात तीघे जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी पुर्वेकडील नेतिवली परिसरातील आनंदनगर वसाहतीमध्ये घडली.
या वसाहतीत मोहजबीन मोमीन ही महिला राहते. तीच्या घराच्या पाठीमागील बाजूस टिंकू मंडल हा व्यक्ती राहतो. त्याचा टॅटू काढण्याचा व्यवसाय आहे. वसाहतीची जागा टिंकूच्या मालकीची आहे. ती जागा मोहजबीन हिला हवी आहे. यावरून त्या दोघांमध्ये वाद आहे. गुरूवारी संध्याकाळी साडेचार वाजता मोहजबीन टिंकूच्या घरी गेली असता त्यावेळी त्यांच्यात मोठा वाद झाला. यात टिंकूने तीच्या अंगावर अॅसिड टाकले यात मोहजबीन 15 टक्के भाजली आहे. तिच्यासह टिंकू हा देखील किरकोळ जखमी झाला आहे. यात भांडण सोडविण्यासाठी आलेल्या अन्य एकाच्या अंगावर अॅसिड पडल्याने तो ही किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी मोहजबीन हिने दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी टिंकू मंडल आणि त्याची पत्नी रेणू मंडल या दोघांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली. टिंकू हा टॅटू काढण्याचे काम करत असल्यामुळे त्याच्याकडे अॅसिड होते अशी माहीती चौकशीत पुढे येत असून या घटनेचा तपास कोळसेवाडी पोलीस करीत आहेत.