भावाला जीवे मारण्याची धमकी देत शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 13:22 IST2019-08-23T13:14:15+5:302019-08-23T13:22:42+5:30
चौदा वर्षाच्या शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना धानोरी येथे घडली.

भावाला जीवे मारण्याची धमकी देत शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार
विमाननगर : भावाला जीवे मारण्याची धमकी देत चौदा वर्षाच्या शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना धानोरी येथे घडली.याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपी धनंजय मारपल्ली (वय 28,रा.धानोरी,विश्रांतवाडी) याच्याविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही आरोपीच्या घराजवळ राहते. "तू माझ्याशी बोलत जा.मी सांगतो तसे कर असे म्हणत भावाला जीवे मारण्याची धमकी देवून तिच्यावर बलात्कार केला.याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध घेत आहेत.