शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

धक्कादायक! हत्येपूर्वी नराधमाने चिमुकलीवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 2:24 PM

वैद्यकीय अहवालातून पुष्टी : बलात्काराचे कलम वाढले

ठळक मुद्दे पॉक्सो आणि अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल : कळमेश्वर तालुक्यात प्रचंड तणाव अनुसूचित जाती - जमाती प्रतिबंधक कायद्याचेही (अ‍ॅट्रोसिटी) कलम या प्रकरणात वाढवण्यात आले आहे.बालिकेचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा निष्कर्ष नोंदवला.

नागपूर -  कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लिंगा शिवारात झालेल्या पाच वर्षीय चिमुकलीच्या हत्या प्रकरणात आणखी एक प्रचंड संतापजनक पैलू उघड झाला आहे. तिची हत्या करण्यापूर्वी नराधम आरोपी संजय देवराव पुरी (३०, रा. लिंगा, ता. कळमेश्वर) याने तिच्यावर बलात्कार केला होता, हे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी आता हत्येसोबतच पॉक्सो कायद्यानुसार बलात्काराचेही कलम आरोपीविरुद्ध लावले असून अनुसूचित जाती - जमाती प्रतिबंधक कायद्याचेही (अ‍ॅट्रोसिटी) कलम या प्रकरणात वाढवण्यात आले आहे.

पीडित बालिका  शुक्रवारी  सायंकाळी ५ च्या सुमारास आजीकडे जातो, असे सांगून घराबाहेर पडली होती. तिची आजी गावातीलच दुस-या वस्तीत राहते. आजीच्या घराकडे जात असलेला रस्ता (पांदण) शेतातून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी बालिकेची आजीच  पीडित बालिकेच्या आईकडे आली. त्यावेळी बालिका बेपत्ता झाल्याचे सर्वांच्या लक्षात आले. त्यानंतर संपूर्ण गावच बालिकेचा शोध घेऊ लागले. ती कुठेच आढळली नाही. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी शनिवारी दुपारी कळमेश्वर ठाण्यात तक्रार नोंदविली.  तिचा शोध घेतला जात असतानाच रविवारी सकाळी बालिकेचा मृतदेह गावालगतच्या संजय भारती (रा. नागपूर) यांच्या शेतात आढळला. तिच्या मृतदेहाची अवस्था बघता तिची हत्या करण्यात आल्याचे दिसून येत होते. त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. माहिती कळताच पोलिसांचा ताफा तेथे धडकला आणि पोलिसांनी तासाभरातच आरोपी संजय पुरीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान रविवारी सायंकाळी त्याने हत्या केल्याची कबुली दिली.  तर, बालिकेचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी हत्येपूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा निष्कर्ष नोंदवला. यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे.

सोमवारी दुपारी या संबंधाने पत्रकारांना माहिती देताना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी वैद्यकीय अहवालानंतर पोलिसांनी हत्येसोबतच पोक्सो कायद्यानुसार बलात्काराचे कलम वाढवले असून, अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याचेही (अ‍ॅट्रोसिटी) कलम या गुन्ह्यात लावण्यात आल्याचे सांगितले आहे. प्रकरणाची संवेदनशिलता लक्षात घेत त्यांनी या संबंधाने विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचे टाळले. जनभावना तीव्र, प्रचंड बंदोबस्त अवघ्या पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचे वृत्त आगीसारखे सर्वत्र पसरले असून, कळमेश्वर तालुक्यात या घटनेने प्रचंड तणाव निर्माण झाला. आजुबाजुच्या गावातील नागरिकांनी लिंगा आणि कळमेश्वरात मोठ्या संख्येत धाव घेतली आहे.  रविवारी रात्री लिंगा गावात कॅण्डल मार्च काढण्यात आला. तर कळमेश्वर ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. प्रकरण चिघळण्याचे संकेत मिळाल्यामुळे पोलिसांनी लिंगा तसेच कळमेश्वरमध्ये मोठा बंदोबस्त लावला आहे. आरोपीला पोलिसांनी अतिशय गोपनिय पद्धतीने कोर्टात हजर करून त्याचा १३ डिसेंबरपर्यंत पीसीआर मिळवला आहे. 

टॅग्स :Rapeबलात्कारMurderखूनArrestअटकPoliceपोलिसnagpurनागपूर