शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

अन् पोलिसांचा जीव भांड्यात पडला! मेडिकलमधून पळून गेलेला अपहरण, बलात्काराचा आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 2:05 PM

Crime News : कुख्यात गुन्हेगार असलेला डांगरे तीन वर्षांपासून कारागृहात होता. त्याला अपहरण, बलात्काराच्या आरोपात सीताबर्डी पोलिसांनी अटक केली होती.

ठळक मुद्देकृष्णा हरिदास डांगरे (२५) असे आरोपीचे नाव आहे.ही माहिती इमामवाडा पोलिसांना कळविण्यात आली. मंगळवारी दुपारी इमामवाडा पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतले.

नागपूर : मेडिकल मधून सोमवारी रात्री पळून गेलेल्या आरोपीच्या मुसक्या बांधण्यात मंगळवारी सकाळी पोलिसांनी यश मिळवले. कृष्णा हरिदास डांगरे (२५) असे आरोपीचे नाव आहे.

 कुख्यात गुन्हेगार असलेला डांगरे तीन वर्षांपासून कारागृहात होता. त्याला अपहरण, बलात्काराच्या आरोपात सीताबर्डी पोलिसांनीअटक केली होती. कारागृहात डांबल्यानंतर त्याला टीबीची लागण झाली. त्यामुळे काही दिवसांपासून त्याच्यावर मेडिकलच्या टीबी वार्डात उपचार सुरू होते. त्याच्यावर देखरेख करण्यासाठी दोन पोलिसांना नियुक्त करण्यात आले होते. सोमवारी रात्री १० च्या सुमारास बाथरूमच्या बहाण्याने डांगरे उठला आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेला. त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली. इमामवाडा, अजनी सक्करदरा, नंदनवन, गणेशपेठ आदी आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांत माहिती देऊन आरोपी डांगरेचा पोलिसांनी शोध सुरू केला. मध्यरात्र होऊनही तो हाती लागला नाही. त्यामुळे नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून शहर तसेच ग्रामीण पोलिसांना मेडिकल मधून बलात्काराचा आरोपी फरार झाल्याचे कळविण्यात आले. त्यामुळे पोलीस यंत्रणा आरोपी डांगरेचा शोध घेऊ लागली. आज भल्या सकाळी एक व्यक्ती संशयास्पद अवस्थेत पारडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्ती पथकाला दिसला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारणा केली असता तो सोमवारी रात्रीमेडिकल मधून पळून गेलेला आरोपी डांगरेच असल्याचे स्पष्ट झाले. ही माहिती इमामवाडा पोलिसांना कळविण्यात आली. मंगळवारी दुपारी इमामवाडा पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध पळून जाण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.... त्याने आधीच ठरवले होते!आरोपी डांगरेने मेडिकलमधून पळून जाण्याचा कट काही दिवसांपूर्वीच रचला होता. त्यानुसार पॅरलिसीससारखा पाय लुळा पडल्याचे तो पोलिसांना सांगायचा. बाथरूमला जाताना दोन-तीन दिवसापासून लंगडत चालायचा. त्याची ती अवस्था पाहून तो पळून जाणार नाही, असा गैरसमज पोलिसांनी करून घेतला होता. दरम्यान, सोमवारी रात्री बाथरूमला गेल्यानंतर परत येताना पोलीस त्याच्यापासुन काही अंतरावर थांबले. डांगरे बेड ऐवजी दारातुन बाहेर जात असल्याने एका पोलिसाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या हाताला झटका मारून डांगरे तेथून सुसाट वेगाने पळून गेला. त्याला शोधण्यासाठी त्याची देखरेख करणारी दोनही पोलिस कर्मचारी, इमामवाडाचे ठाणेदार मुकुंद साळुंके आणि त्यांचे सहकारी टीबी वॉर्डच्या बाजूला असलेल्या झुडपी भागात रात्रभर शोधाशोध करीत होते. मात्र आरोपी त्यांच्या हाती लागला नाही.

पोलिसांचा जीव भांड्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी पळाल्याची आठ दिवसातील ही दुसरी घटना आहे. गेल्या आठवड्यात पाचपावली पोलिस ठाण्यातून रेमडेसिविरची काळाबाजारी करणारा उबेद नामक आरोपी पळून गेला होता. चार दिवसानंतर पोलिसांनी त्याला पकडले तर आता मेडिकल मधून डांगरे पळून गेला होता. तो हाती लागल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला आहे.

टॅग्स :ArrestअटकKidnappingअपहरणPoliceपोलिसMedicalवैद्यकीयnagpurनागपूर