पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळलेल्या आरोपीला वापीतून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 23:40 IST2019-05-30T23:39:30+5:302019-05-30T23:40:34+5:30

पोलिसांनी वापी परिसरात सापळा रचून त्याला अटक केली आहे

The accused escaped from the custody of the police arrested from Vapi | पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळलेल्या आरोपीला वापीतून अटक

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळलेल्या आरोपीला वापीतून अटक

मुंबई - मानसिक दृष्ट्या अस्थिर अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पोलिसांच्या तावडीतून पळ काढलेल्या ४७ वर्षीय आरोपीला वर्सोवा पोलिसांनीगुजरातच्या वापी परिसरातून अटक केली आहे. एक्स गर्लफ्रेंडने घात करत, आरोपी संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर आरोपीचा ठाव ठिकाणा पोलिसांना कळाला. त्यानुसार, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नैसर्गिक विधीसाठी पोलिसांनी त्याला रुग्णालयातील शौचालयात नेलं असता त्यानं येथून पळ काढला होता.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी वर्सोवा पोलिसांनी या आरोपीला अटक केली होती. न्यायालयानं त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी दिली. आरोपीला डायबेटीज असल्यानं पोलिसांनी त्याला वैद्यकीय उपचारासाठी प्रथम जे.जे. रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. सोमवारी त्याची रवानगी अंधेरीतील कोठडीत करायची असल्यामुळे त्याआधी वैद्यकीय अहवाल सादर करणं गरजेचं होतं. त्यामुळं सोमवारी आरोपीला कूपर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी आणलं होतं. त्यावेळी नैसर्गिक विधीच्या नावाखाली आरोपी शौचालयात गेला असताना त्यानं शौचालयाच्या खिडकीतून पळ काढला.
आरोपी त्याच्या रत्नागिरी येथील प्रेयसीच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीस तिच्याजवळ चौकशीकरिता रत्नागिरीला गेले होते. त्यावेळी तो दुसऱ्या सिमकार्डहून प्रेयसीला संपर्क करत असून त्याचं टॉवर लोकेशन गुजरातच्या वापी इथलं दाखवत होतं. त्यानुसार, पोलिसांनी वापी परिसरात सापळा रचून त्याला अटक केली आहे.

Web Title: The accused escaped from the custody of the police arrested from Vapi