कोर्टात वकिलाला जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने केली मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 17:49 IST2020-01-06T17:45:43+5:302020-01-06T17:49:26+5:30
वकील संघटनेने मारहाणीचा निषेध करून न्यायालयाचे काम बंद ठेवले.

कोर्टात वकिलाला जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने केली मारहाण
सदानंद नाईक
उल्हासनगर : वकील राजेंद्र भालेराव यांना आरोपी राहुल टाक याने जवळ बोलावून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. हे प्रकरण दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान भर न्यायालयात घडल्याने एकच खळबळ उडाली असून पोलिसाने आरोपीला अटक केली. वकील संघटनेने मारहाणीचा निषेध करून न्यायालयाचे काम बंद ठेवले.
उल्हासनगर - कोर्टात वकील राजेंद्र भालेराव यांना आरोपीकडून मारहाण; आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) January 6, 2020
उल्हासनगरमधील चोपडा येथील न्यायालयात वकील राजेंद्र भालेराव नेहमीप्रमाणे काम करीत होते. दरम्यान हाणामारी आणि चोरीतील आरोपी राहुल टाक याने भर न्यायालयात भालेराव यांना जवळ बोलावून शिविगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी देत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी एक महिला वकिलाने मध्यस्थी करण्याचा पर्यंत केला असता त्यांनाही शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी टाक याने दिली. हे प्रकरण सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान घडला असून आरोपी राहुल टाकचे वकील स्वतः राजेंद्र भालेराव आहे, असे असताना भालेराव यांनी कोणत्या कारणास्तव मारहाण केली. हे मध्यवर्ती तपासात निष्पन्न होणार आहे.
वकील राजेंद्र भालेराव याना आरोपीकडून मारहाण झाल्याची घटना भर न्यायालयात घडल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी राहुल टाक याला अटक करून न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मध्यवर्ती पोलीसानी सुरू केली. तसेच भालेराव हेही मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आरोपी स्वतः तक्रार दाखल करणार आहेत.