शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

मोबाईलवरून लैंगिक सुखाची महिलेकडे मागणी करणाऱ्या भामट्यास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 7:50 PM

सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या निवडणुकीच्या वादातून झाल्याचे तपासात समोर आलं.

ठळक मुद्देपोलिसांनी भा. दं. वि. कलम ५०९, माहिती व तंत्रज्ञान कायदा ६६ (क), ६७ अन्वये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन अज्ञात आरोपीची माहिती प्राप्त केली आणि आज त्याला बेड्या ठोकल्या. आरोपी पारेख हा व्यावसायिक असून त्याचा कस्टम ट्रान्सपोर्ट क्लियरिंगचा व्यवसाय आहे.  

मुंबई - Locanto.net  या वेबसाईटवर अश्लील मजकूर अपलोड करून महिलांची बदनामी करणाऱ्या इसमास गुन्हे शाखा कक्ष ११ ने अटक केली आहे. या आरोपीचं नायब अल्पेश वल्लभदास पारेख (४७) असं असून तो मालाड येथे राहतो. तक्रारदार महिला बँक व्यवसायात नोकरीस आहे. तसेच त्या राहत असलेल्या इमारतीच्या सोसायटीचे पदाधिकारी म्हणून काम देखील पाहतात. १६ एप्रिल रोजी तक्रारदार महिला या कामावर असताना त्यांना त्यांच्या मोबाईलवर अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन आला आणि फोन करणाऱ्या व्यक्तीने तक्रादार महिलेकडे लैंगिक सुखाबाबत, रिलेशनशिपबाबत विचारणा केली. Locanto.net या वेबसाईवर तुमचा फोटो आणि मोबाईल क्रमांकासह जाहिरात दिलेली असल्याची माहिती आरोपीने तक्रारदार महिलेला दिली. त्यानंतर महिलेस वारंवार आरोपी पारेख वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून अज्ञात व्यक्तींकडून लैंगिक सुखाची मागणी करून व्हॉट्सअपवर देखील रिलेशनशिपबाबत अश्लील मेसेज करू लागला. याप्रकरणी मानसिक तणावाखाली आलेल्या महिलेले बांगूर नगर पोलीस ठाण्यात २१ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी भा. दं. वि. कलम ५०९, माहिती व तंत्रज्ञान कायदा ६६ (क), ६७ अन्वये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

याप्रकरणी गुन्हे शाखा कक्ष क्रमांक ११ ने तपास सुरु केला. तपासात तक्रारदार महिला राहत असलेल्या सोसायटीच्या एका पुरुष पदाधिकाऱ्याबाबतचा अश्लील मजकूर  Locanto.net या वेबसाईटवर टाकल्याचे आढळले. पोलिसांनी सोसायटीतील व्यक्तींकडे तपस केला असता सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या निवडणुकीच्या वादातून झाल्याचे तपासात समोर आलं. तपासात क्लिष्टता असूनही तांत्रिक तपासद्वारे एका ईमेल आयडी शोधण्यात पोलिसांना यश आलं. त्यानंतर पोलिसांनी अथक परिश्रम घेऊन अज्ञात आरोपीची माहिती प्राप्त केली आणि आज त्याला बेड्या ठोकल्या. आरोपी पारेख हा व्यावसायिक असून त्याचा कस्टम ट्रान्सपोर्ट क्लियरिंगचा व्यवसाय आहे.  

टॅग्स :MolestationविनयभंगITमाहिती तंत्रज्ञानPoliceपोलिसArrestअटकsexual harassmentलैंगिक छळ