शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भाजप प्रदेशाध्यक्षांच्या नावे फोन करून खंडणी मागितल्याप्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 18:12 IST

निगडीतील रुग्णालयाकडे केली होती २५ लाखांची मागणी  

ठळक मुद्देआरोपी विशाल शेंडगे याच्याविरोधात कोथरूड, कोंढवा व पौड व समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

पिंपरी : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांचा पी. ए. बोलत असल्याचे सांगून २५ लाखांची खंडणी मागणाऱ्या मुख्य सुत्रधार व त्याचा साथीदारास पोलिसांनी जेरबंद केले. मोबाइल लोकेशनवरून माग काढून त्यांना पुणे येथून ताब्यात घेऊन अटक केली. निगडी पोलिसांनी ही कामगिरी केली. 

या प्रकरणातील मुख्य सुत्रधार विशाल अरुण शेंडगे (सध्या रा. कोंढवा, मूळ रा. लोहियानगर) व त्याचा साथीदार किरण धन्यकुमार शिंदे (रा. लोहियानगर) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच यापूर्वी पोलिसांनी सौरभ संतोष अष्टूळ (वय २१, रा. गंजपेठ, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथील एका नामांकित रुग्णालयात आरोपी यांनी १८ जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास फोन केला होता. मी चंद्रकात दादा पाटील यांच्या आॅफीसमधून दादांचा पी. ए. सांवत बोलतोय. कोरोनाच्या महामारीमुळे गरिबांची अवस्था बिकट झाली आहे. त्यांच्या मदतीसाठी ताबडतोब २५ लाख रूपये आमच्या पर्वतीच्या कार्यकर्त्याकडे पाठवून द्या, नाहीतर तुमचे हातपाय तोडून जिवे मारून टाकीन, अशी धमकी दिली होती. याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपीच्या मोबाइल टॉवर लोकेशनची माहिती मिळविली. तो फोन येरवडा येथील नारळपाणी विक्रेत्याच्या मुलीचा असल्याचे समोर आले. सदरचा मोबाईल क्रमांक माझ्या वडिलांचा असून त्याचे सिमकार्ड २९ जून रोजी चोरीला गेले आहे, असे मुलीने सांगितले. संबंधित मुलगी व तिचे वडील आरोप नसल्याचे चौकशीत समोर आले. आरोपी यांनी सदरच्या क्रमांकावरून पुण्यातील काही जणांना फोन करून त्यांच्याकडे देखील चंद्रकात दादा पाटील यांच्या कार्यालयातून बोलतो म्हणून वरील कारणाने पैशाची मागणी केल्याचे समोर आले. त्यातील एका व्यापाऱ्याला आरोपी यांना फोन करण्यास सांगून पैसे घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार सापळा लावून पोलिसांनी आरोपी सौरभ अष्टूळ याला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपी विशाल शेंडगे मुख्य सूत्रधार असून आरोपी किरण शिंदे याचाही या गुन्ह्यात समावेश असल्याचे समोर आले. 

पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. मात्र आरोपी पुण्यात लपून असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला. त्यांना आरोपींशी संपर्क साधण्यास सांगून त्यांना भेटण्यास बोलाविले. भेटायला येते, असे आरोपी यांनी सांगितले. मात्र नातेवाईक व पोलिसांनी दिवसभर प्रतीक्षा करूनही आरोपी भेटायला आले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरून आरोपी यांचा माग काढला. त्यानंतर त्यांना गुरुवारी (दि. २३) रात्री पुणे येथून ताब्यात घेतले व निगडी पोलीस ठाण्यात आणून चौकशी करून अटक केली. चंद्रकात दादा पाटील यांचा पी. ए. बोलतोय, असे सांगून आरोपी यांनी पुण्यातील काही नागरिकांना पैसे मागितल्याचे उघडकीस आले. आरोपी विशाल शेंडगे याच्या विरोधात कोथरूड, कोंढवा व पौड व समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आमदार चंद्रकात पाटील,आमदार बाबर, आमदार निम्हण यांचे नाव घेऊन पैसे मागितल्याने खंडणीचे व फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोकाटे, महेंद्र आहेर, पोलीस कर्मचारी किशोर पढेर, मच्छिंद्र घनवट, सतीश ढोले, विलास केकाण, सुनील जाधव, रमेश मावसकर, आत्मलिंग निंबाळकर, सोपान बोधवड, भुपेंद्र चौधरी, विनोद व्होनमाने, विजय बोडके, तुषार गेंगजे, राहुल मिसाळ, अमोल सांळूखे, दीपक जाधवर, तानाजी सोनवणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकchandrakant patilचंद्रकांत पाटील