शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

फेक फेसबुक अकाऊंटवरून प्रियांका गांधी, अनिल देशमुख यांच्याविरोधात अश्लील पोस्ट करणाऱ्या आरोपीला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 21:29 IST

Crime News : तो मूळचा उस्मानाबाद जिल्ह्याचा रहिवासी असून तो पुण्यात चिखली येथे एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. 

ठळक मुद्देपुण्याच्या श्रिशैल शरणप्पा खज्जे याने फेसबुकवर या अश्लील पोस्ट केल्याचा आरोप असून, मुंबई पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सोशल मीडियावर अश्लील पोस्ट करणाऱ्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. पुण्याच्या श्रिशैल शरणप्पा खज्जे याने फेसबुकवर या अश्लील पोस्ट केल्याचा आरोप असून, मुंबई पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तो मूळचा उस्मानाबाद जिल्ह्याचा रहिवासी असून तो पुण्यात चिखली येथे एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. मुंबई सायबर सेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीशैल याने आप्पा केसर जावळगेकर या नावाने फेसबुकवर फेक अकाऊंट तयार केले. याच अकाऊंटवरुन त्याने प्रियांका गांधी आणि अनिल देशमुख यांच्याविरोधात अश्लील पोस्ट केली. याबाबत तक्रार आल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ६ ने ९ ऑक्टोबरला गुन्हा दाखल केला. नंतर गुन्ह्याचा तपास सुरु केला. तपासात गुन्हे शाखेच्या युनीट ६ ला श्रीशैलच्या फेक फेसबुक अकाऊंटची माहिती मिळाली आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेकडून याबाबत अधिक तपास सुरु आहे. मुंबई पोलीस आरोपी श्रीशैलची कसून चौकशी करत आहेत. त्याने याअगोदर देखील काही आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या आहेत का? तसेच आरोपीला काही राजकीय पार्श्वभूमी आहे का? ती असेल तर, यामागे नेमका कुणाचा हात असेल? या सर्व गोष्टींचा सखोल तपास मुंबई पोलिसांकडून केला जात आहे. तसेच अश्लील पोस्ट करण्यामागे त्याचा नेमका काय उद्देश असावा, याची देखील चौकशी मुंबई पोलीस करत आहे. 

टॅग्स :ArrestअटकFacebookफेसबुकPoliceपोलिसPriyanka Gandhiप्रियंका गांधीAnil Deshmukhअनिल देशमुखPuneपुणे