चहा चांगला नसल्याच्या वादातून कँटिनमधल्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 20:56 IST2022-06-09T20:55:48+5:302022-06-09T20:56:18+5:30
Murder Case : १६ वर्षीय मुलाची चहा चांगला नसल्याच्या वादात हत्या करून पसार झालेल्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

चहा चांगला नसल्याच्या वादातून कँटिनमधल्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
मीरारोड - भाईंदर पूर्व जवळील एका कंपनीतील कँटीन मधल्या १६ वर्षीय मुलाची चहा चांगला नसल्याच्या वादात हत्या करून पसार झालेल्या मुख्य आरोपीला पोलिसांनीअटक केली आहे.
भाईंदर फाटक येथील युनायटेड रबर कंपनीत काम करणाऱ्या कामगार उपेंद्र श्रीकांत चौहान (१८) ह्याने चहा चांगला नसल्याच्या वादातून कँटीनमध्ये काम करणाऱ्या सज्जाद अश्रफुल अली (१६) ह्याला मारहाण करून चाकूने हत्या केली होती . ७ जून रोजी नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौहान चा साथीदार कामगार सुरज झांगुर राजभर (२२) ह्याला अटक केली होती.
रात्री 11 वाजता लाईट गेली, हनिमूनला नववधुने केले हे भयानक कृत्य; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
परंतु हत्या करून चौहान पसार झाला होता . पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली . ठाणे न्यायालयाने दोन्ही आरोपीना १३ जून पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. गुन्हयाचा पुढिल तपास पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे करत आहेत.