१२ वर्षापासून फरार आरोपीस अटक; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 13:18 IST2019-04-17T13:15:38+5:302019-04-17T13:18:25+5:30
याप्रकरणी डोंबिवलीतील विष्णू नगर पोलीस ठाण्यात २१ मार्च २००७ रोजी गुन्हा दाखल करण्यात होता.

१२ वर्षापासून फरार आरोपीस अटक; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई
ठाणे - खुनाच्या गुह्यात १२ वर्षापासून फरार असलेल्या राजकुमार राजावत (६२) या आरोपीस अटक ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट - १ च्या पथकाने १५ एप्रिल २०१९ रोजी मध्य प्रदेश येथून अटक केल्याची माहिती उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली. नोकरी लावण्याचे अमिष दाखवून शैलेंद्र शेखावत याने काही लोकांचे पैसे घेतले होते. पैसे घेउनही त्याने नोकरीही लावली नाही. याच कारणावरुन राजावत याच्यासह चौघांनी त्याचा खून केला होता. याप्रकरणी डोंबिवलीतील विष्णू नगर पोलीस ठाण्यात २१ मार्च २००७ रोजी गुन्हा दाखल करण्यात होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकाने अखेर राजावतला मध्यप्रदेशातील वरहा गावतून अटक केली.