Accused arrested in 3 hours who stole a photographer's bag | प्रसिद्ध फोटोग्राफरची बॅग पळवणारे चोरटे कैद, तीन तासात लावला छडा

प्रसिद्ध फोटोग्राफरची बॅग पळवणारे चोरटे कैद, तीन तासात लावला छडा

ठळक मुद्देजलील शेख, मोहम्मद फरहान अली शेख, अरबाज अकबर घनसे अशी या आरोपींची नावे आहे. दरम्यान या प्रकरणी नियाज यांनी शिवडी पोलिसात तीन दिवसांनी म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली. 

मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रातील राजकिय नेत्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपणाऱ्या छायाचित्रकाराचा कॅमेरा चोरणाऱ्या तिघांना शिवडी पोलिसांनीअटक केली आहे. जलील शेख, मोहम्मद फरहान अली शेख, अरबाज अकबर घनसे अशी या आरोपींची नावे आहे. न्यायालयाने या तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. महत्वाचं म्हणजे पोलिसांनी अवघ्या तीन तासात कॅमेराची बॅग शोधून दिली आहे. 

मुंबईत राहणारे नियाज बकरीदी मन्सूरी हे प्रसिद्ध फोटोग्राफर आहेत. मुख्यमंत्र्यांपासून ते अनेक राजकिय पुढाऱ्यांसाठी ते काम करतात. १५ ऑगस्टनिमित्त शिवडीच्या बीपीसीएल परिसरात स्वातंत्र  दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नियाज हे फोटो काढण्यासाठी आले होते.फोटो काढत असताना, अचानक आलेल्या पावसामुळे त्या कार्यक्रमावेळी एकच पळापळ झाली. त्यावेळी नियाज हे देखील पावसात कॅमेरा भिजू नये म्हणून त्याच्या गाडीत येऊन बसले. मात्र, त्याच दरम्यान ते त्यांची बॅग कार्यक्रमाच्या ठिकाणी विसरले. त्याच्या बॅगेत निकॉनचा किंमती कॅमेऱ्यांच्या लेन्स होत्या. 

पाऊस गेल्यानंतर नियाज पुन्हा कार्यक्रम असलेल्या ठिकाणी आले. त्यावेळी त्यांना त्यांची बॅग मिळून आली नाही. सर्वत्र शोधले असता बॅग चोरीला गेले असल्याचा त्यांना संशय आला. मात्र, तातडीने मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जायचे असल्याने त्यांनी पोलिसात तक्रार न करता. त्या कार्यक्रमाच्या दिशेने धाव घेतली. दरम्यान या प्रकरणी नियाज यांनी शिवडी पोलिसात तीन दिवसांनी म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली. 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोर्ट झोनच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक किरण मांडरे यांनी तपासाला सुरूवात केली.परिसरातील शेकडो सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यांना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन आरोपी अस्पष्ट त्या कार्यक्रमाजवळ दिसून आले. हे तिघे काही तरी संशयास्पद वस्तू नेत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळा पोलीस उपनिरीक्षक मांडरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीत यातील एक आरोपी रे रोड परिसरात रहात असल्याचे कळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्या चौकशीतून पोलीस इतर दोन आरोपींपर्यंत पोहचले. या तिघांपैकी एका आरोपीच्या घरातून पोलिसांनी नियाज याची चोरलेली कॅमेऱ्याची बॅग तक्रार नोंदवल्यानंतर अवघ्या तीन तासात हस्तगत करण्यात आली आहे. 

Web Title: Accused arrested in 3 hours who stole a photographer's bag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.