१३ वर्षापूर्वी फरार झालेल्या कैद्याला मध्यप्रदेशहून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 07:49 PM2019-07-31T19:49:51+5:302019-07-31T19:51:13+5:30

१३ वर्षापूर्वी त्यांनी अन्य तीन कैद्याबरोबर मिळून सडा उपकारागृहातून पोबारा काढला होता.

Accuse who are absconding since 13 yeras is arrested from Madhya Pradesh | १३ वर्षापूर्वी फरार झालेल्या कैद्याला मध्यप्रदेशहून अटक

१३ वर्षापूर्वी फरार झालेल्या कैद्याला मध्यप्रदेशहून अटक

googlenewsNext
ठळक मुद्देभिंण्ड गावात पोचल्यानंतर त्यांनी तेथील स्थायिक पोलीसांची मदत घेऊन राहुल शर्मा याला गजाआड केला. सडा उपकारागृहातून अन्य तीन कैद्यासहीत कारागृहाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या खिडकीचे गंज कापून येथून पोबारा काढला होता.

वास्को - १३ वर्षापूर्वी दक्षीण गोव्यातील सडा उपकारागृहाच्या खिडकीचे गंज कापून पलायन केलेल्या चार कैद्यापैंकी राहुल रामप्रकाश शर्मा यास मुरगाव पोलीसांनी मध्यप्रदेश, भिंण्ड याथील गावातून अटक केल्यानंतर आज गोव्यात घेऊन आले. २००४ मध्ये कोलवा येथील एका हॉटेलात वेटर म्हणून काम करत असताना राहुल यांने प्रमोद सोनी नावाच्या अन्य एका वेटरचा खून केल्याने त्याच्यावर याबाबत खटला चालू असताना १३ वर्षापूर्वी त्यांनी अन्य तीन कैद्याबरोबर मिळून सडा उपकारागृहातून पोबारा काढला होता.
१३ वर्षापूर्वी सडा उपकारागृहातून फरार झालेला राहुल शर्मा नावाचा कैदी मध्यप्रदेश येथील भिंण्ड गावात असल्याची माहिती मुरगाव पोलीसांना मिळताच त्याला गजाआड करण्यासाठी येथील पोलीस पथक शुक्रवारी (दि. २६) मध्यप्रदेशला रवाना झाले. मुरगाव पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक श्रीधर कामत व अन्य पोलीस शिपाई - अधिकारी मध्यप्रदेश, भिंण्ड गावात पोचल्यानंतर त्यांनी तेथील स्थायिक पोलीसांची मदत घेऊन राहुल शर्मा याला गजाआड केला. यानंतर त्याच्याशी कसून चौकशी केली असता २००६ मध्ये आपण सडा उपकारागृहातून पलायन केल्याचे त्यांनी कबूल केले. सोमवारी राहूल शर्मा यास गोव्यात आणल्यानंतर त्याला भादस २२४ कलमाखाली अटक करण्यात आल्याची माहीती पोलीसांनी पुढे दिली. ह्या प्रकरणाबाबत अधिक माहीती घेण्यासाठी पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांना संपर्क केला असता २३ एप्रिल २००६ मध्ये (१३ वर्षापूर्वी) सडा उपकारागृहातून चार कैद्यांनी पोबारा काढल्याची माहीती दिली. यात राहूल शर्मा याच्यासहीत राजाराम मोरे (गुजरात), झेवीयर डी’सोझा (कारवार, कर्नाटक) व राजू मोवेल (आंन्द्र प्रदेश) यांचा समावेश होता. सडा उपकारागृहातून पोबारा काढलेल्या ह्या कैद्यांचा शोध घेण्याचा त्याकाळात बराच प्रयत्न करण्यात आला, मात्र तेव्हा ते सापडले नाहीत. २०१२ सालात नंतर राजाराम मोरे ह्या पलायन केलेल्या कैद्याला गजाआड करण्यास मुरगाव पोलीसांना यश आल्याची माहीती उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली. पोलीसांशी फरार असलेल्या कैदी - आरोपींची यादी असत असून वेळोवेळी हे कैदी आपल्या गावात अथवा घरी पोचले आहेत काय याबाबत चौकशी करत असल्याची माहीती उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली. सडा उपकारागृहातून १३ वर्षापूर्वी फरार झालेला राहूल रामप्रकाश शर्मा आपल्या गावी मध्यप्रदेश, भिंण्ड येथे पोचल्याची खात्रीलायक माहीती नुकतीच पोलीसांना मिळाली. सदर माहीती मिळाल्यानंतर पोलीसांनी तेथे धाव घेऊन त्या गावातील स्थानिक पोलीसांच्या मदतीने माहीती मिळालेल्या ठिकाण्यावर छापा टाकून राहूल शर्मा यास गजाआड केल्याचे सावंत यांनी सांगितले. १३ वर्षापूर्वी फरार झालेला कैदी राहुल याच्यात थोडे बदल झाल्याने नंतर त्याची कसून चौकशी केली असता सडा उपकारागृहातून आपण फरार झाल्याचे त्यांनी मान्य केल्याची माहीती सावंत यांनी दिली. यानंतर त्याला गजाआड करून गोव्यात आणल्यानंतर मुरगाव पोलीसांनी अटक केली असल्याचे सुनिता सावंत यांनी माहीतीत सांगितले.
राहूल शर्मा हा २००४ मध्ये कोलवा येथे असलेल्या ‘सागर किनारा रेस्ट्रोरंण्ट’ मध्ये वेटर म्हणून काम करायचा. याकाळात त्याच्यासहीत वेटर म्हणून काम करणारा त्याचा अन्य एक साथिदार प्रमोद सोनी (राजस्थान) याच्याशी वाद निर्माण झाल्यानंतर राहूलने त्याच्यावर सुऱ्याने हल्ला करून खून केला होता अशी माहीती पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली. हा वाद प्रेम प्रकरणावरून निर्माण झाला होता असे ह्या काळात पोलीसांकडून करण्यात आलेल्या तपासणीत सामोरे आले होते अशी माहीती उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली. ह्या खून प्रकरणाचा खटला न्यायालयात चालू असल्याने राहुल यास सडा उपकारागृहात ठेवण्यात आले होते. ह्या काळातच त्यांने सडा उपकारागृहातून अन्य तीन कैद्यासहीत कारागृहाच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या खिडकीचे गंज कापून येथून पोबारा काढला होता. १३ वषार्नंतर राहुल यास गजाआड केल्यानंतर सदर प्रकरणाचा मुरगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.
 

Web Title: Accuse who are absconding since 13 yeras is arrested from Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.