सराईत चोर गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच लाखाचा ऐवज हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 21:31 IST2018-08-21T21:31:20+5:302018-08-21T21:31:52+5:30
8 चोरीचे गुन्हे उघड झाले असून त्याच्यावर 32 पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली आहे.

सराईत चोर गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच लाखाचा ऐवज हस्तगत
उल्हासनगर - शहर गुन्हे अन्वेषण विभागाने एका सराईत घरफोडी चोराला अटक करून त्याच्याकडून साडे पाच लाखाचा ऐवज हस्तगत केला. तसेच 8 चोरीचे गुन्हे उघड झाले असून त्याच्यावर 32 पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली आहे.
उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभाग परिमंडळ-4 मधील गुन्ह्याचा तपास करीत होते. त्यावेळी एक सराईत घरफोडी चोर 10 आगष्ट रोजी बदलापूर येथील रेल्वे स्टेशन येथे येणार असल्याची माहिती विभागाला मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. रेल्वे स्टेशन परिसरात संशयीतरित्या फिरणाऱ्या कैलास चिंतामण मोरे याला अटक केली. पोलिसांनी त्याला बोलते केले असता तीन मित्र व स्वीफ़्ट गाडीने बंद घरात भरदिवसा चोरी करीत करीत असल्याची माहिती दिली. परिमंडळातील 8 ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली कैलासने दिल्यावर, पोलिसांनी झाडाझडतीत 3 लाख 40 हजार रुपये किंमतीचे दागिने व 2 लाख 10 हजार किमतीची चोरी वेळी वापरलेली स्वीफ़्ट गाडी हस्तगत केली.
शहर गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या चौकशीत कैलास मोरे यांच्यावर धुळ्यासह गुजरात सिल्वासा, वसई, पालघर आदी परिसरात तब्बल 32 घरफोडीचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहे. तो काही दिवसांपूर्वीच आर्थर जेलमधून सुटून बाहेर आला आहे. पोलीस त्याच्या तीन साथीदारांसह अधिक तपास करीत आहे. त्याच्याकडून घरफोडीचे अनेक गुन्हे उघड करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.