मोटरमनने दाखवले प्रसंगावधान, लोकल थांबवल्यानं आत्महत्या करणाऱ्याचा जीव वाचला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 03:59 PM2020-12-22T15:59:25+5:302020-12-22T16:12:27+5:30

Accident Attempt : अंबरनाथ स्थानकाजवळ मंगळवारी सकाळी घडली घटना

According to the motorman, stopping the locomotive saved the life of the person who committed suicide | मोटरमनने दाखवले प्रसंगावधान, लोकल थांबवल्यानं आत्महत्या करणाऱ्याचा जीव वाचला

मोटरमनने दाखवले प्रसंगावधान, लोकल थांबवल्यानं आत्महत्या करणाऱ्याचा जीव वाचला

Next
ठळक मुद्दे मोटरमनने प्रसंगावधान राखत वेळीच लोकल थांबवल्यानं या इसमाचा जीव वाचला.या इसमाचं वय अंदाजे ५० वर्ष असून त्याने आत्महत्येचा प्रयत्न नेमका का केला? याचा तपास सध्या रेल्वे पोलीस करतायत.

अंबरनाथ : अंबरनाथमध्येरेल्वे रुळांवर झोपून एका इसमाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. मोटरमनने प्रसंगावधान राखत वेळीच लोकल थांबवल्यानं या इसमाचा जीव वाचला.
             

अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळच मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. कर्जतहुन मुंबईच्या दिशेनं जाणारी लोकल भरधाव वेगात अंबरनाथ स्थानकात येत असताना अचानक हाल्याचा पाडा परिसरात एक इसम लोकलसमोर रेल्वे रुळांवर झोपल्याचं मोटरमनच्या निदर्शनास आलं. त्यामुळं मोटरमनने इमर्जन्सी ब्रेक लावत या इसमापासून अवघ्या काही फुटांवर लोकल थांबवली. यानंतर काही प्रवासी, रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे पोलिसांनी या इसमाला रेल्वे स्थानकात आणलं. या घटनेमुळे काही काळ मोठा गोंधळ उडाला. तसंच लोकलही काही मिनिटं खोळंबली. या इसमाचं वय अंदाजे ५० वर्ष असून त्याने आत्महत्येचा प्रयत्न नेमका का केला? याचा तपास सध्या रेल्वे पोलीस करतायत.
 

Web Title: According to the motorman, stopping the locomotive saved the life of the person who committed suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.