वरळीमधील अपघातात एका तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 19:33 IST2019-11-12T19:32:13+5:302019-11-12T19:33:23+5:30
टेम्पोतून कॉम्प्रेसर मशीन घेवून जात असताना चालकाने अचानक ब्रेक लावल्याने झालेल्या अपघातात शेरु डावर (वय १८) याचा मृत्यू झाला.

वरळीमधील अपघातात एका तरुणाचा मृत्यू
मुंबई : टेम्पोतून कॉम्प्रेसर मशीन घेवून जात असताना चालकाने अचानक ब्रेक लावल्याने झालेल्या अपघातात शेरु डावर (वय १८) याचा मृत्यू झाला. वरळीतील जुने पासपोर्ट कार्यालयाजवळ सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी वरळी पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.
वरळीतील अॅनी बेझंट मार्गावरुन टेम्पो (एम.एच.३-सीपी- ३५४०) मधून कॉम्प्रेसर मशीन नेण्यात येत होते. चालकाने अचानक ब्रेक मारल्याने मशीन टेम्पोत बसलेला कामगार शेरु डावर याच्या अंगावर पडला. त्यात गंभीर जखमी होवून त्याचा जागीच मृत्यू झाला.