शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मुलाची लग्नपत्रिका वाटप करताना अपघात; आई-वडील जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 19:23 IST

Accident Case : सूर्यकांत पाटील (५०) व जयश्री पाटील (४५, रा. मेथी मेलकंदावाडी, हमु. भालकी, जि. बीदर) असे अपघातात मयत झालेल्या पती- पत्नीचे नाव आहे. सूर्यकांत पाटील यांचा मुलगा साईनाथ याचा विवाह २६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.

भालकी (जि. बीदर) : मुलाची लग्नपत्रिका वाटप करुन गावाकडे परतताना अपघात होऊन पती- पत्नी जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री बीदर - उदगीर मार्गावरील सेवालाल तांड्याजवळ घडली.सूर्यकांत पाटील (५०) व जयश्री पाटील (४५, रा. मेथी मेलकंदावाडी, हमु. भालकी, जि. बीदर) असे अपघातात मयत झालेल्या पती- पत्नीचे नाव आहे. सूर्यकांत पाटील यांचा मुलगा साईनाथ याचा विवाह २६ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या विवाहाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी सूर्यकांत पाटील व त्यांची पत्नी जयश्री पाटील हे दोघे बुधवारी बिदरला गेले होते. तिथे पत्रिका वाटप करुन रात्री उशिरा भालकीकडे परतत होते. तेव्हा बीदर- उदगीर मार्गावरील सेवालाल तांड्याजवळ त्यांची जीप उलटून अपघात झाला. त्यात दोघेही जागीच ठार झाले.मुलाने संपर्क साधला मात्र...दरम्यान, आई- वडिलांस येण्यास वेळ का लागत आहे, म्हणून मुलगा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, मोबाईल लागत नव्हता. त्यामुळे मुलाने व घरातील इतर मंडळींनी रात्रभर वाट पाहिली. दरम्यान, गुरुवारी सकाळी रस्त्याच्या बाजूस कार उलटून अपघात झाल्याने त्यात दोघांचा मृत्यू झाल्याचे समजले. त्यामुळे घरातील मंडळींनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पाहणी केली असता दोघेही ठार झाल्याचे निदर्शनास आले.आ.ईश्वर खंड्रे यांची घटनास्थळी भेट...या अपघाताची माहिती समजताच भालकीचे आमदार ईश्वर खंड्रे व पोलीस अधिका-यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मयत दोघांवरही मेथी मेलकुंडा वाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत सूर्यकांत पाटील हे ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व भावंडे असा परिवार आहे.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूmarriageलग्न