दारूने भरलेल्या मालवाहू जीपला अपघात; जीपचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 18:40 IST2022-06-04T18:39:28+5:302022-06-04T18:40:23+5:30
Accident Case : यात दारूच्या काही बाटल्या फुटल्या असून ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली.

दारूने भरलेल्या मालवाहू जीपला अपघात; जीपचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी नाही
वाडा : भिवंडी-वाडा मार्गावरील वैतरणा पुलावर दारूने भरलेल्या मालवाहू जीपला अपघात झाला असून या अपघातात जीपचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यात दारूच्या काही बाटल्या फुटल्या असून ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू जीप भिवंडी येथील गोदामामधून दारूचा माल घेऊन विविध दारू विक्रेत्यांना पुरवठा करीत असते. शनिवारी सकाळच्या सुमारास ही गाडी वाड्याकडे जात असताना वैतरणा नदी पुलावर जीपचे लायनर जाम झाल्याने गाडीवर नियंत्रण करता आले नसल्याने पुलावरच गाडी पलटी झाल्याचे चालक अफरोज शेख याने सांगितले. या अपघातात पुलाचा कठडाही तुटला आहे.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दारूच्या बाटल्याही फुटल्या आहेत. दुदैवाने गाडी पुलाखाली गेली असती तर जीवितहानी झाली असती, मात्र गाडी पुलावरच पलटी झाली. पुलावर अपघात झाल्याने काही काळ एकेरी वाहतूक सुरू होती. अधिक तपास वाडा पोलीस करीत आहेत.