Accident News Solapur: सोलापूर- अक्कलकोट महामार्गावर दोन ट्रक, कारमध्ये विचित्र अपघात; सहा जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 08:32 AM2022-01-26T08:32:38+5:302022-01-26T10:05:06+5:30

Accident News Solapur: सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. क्रेनच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले.

Accident News Solapur: accident on Solapur-Akkalkot highway; Four killed in car crash with two trucks | Accident News Solapur: सोलापूर- अक्कलकोट महामार्गावर दोन ट्रक, कारमध्ये विचित्र अपघात; सहा जण गंभीर

Accident News Solapur: सोलापूर- अक्कलकोट महामार्गावर दोन ट्रक, कारमध्ये विचित्र अपघात; सहा जण गंभीर

googlenewsNext

सोलापूर : दोन दिवसांपूर्वीच वर्ध्यामध्ये कार अपघातात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज सोलापूरमध्ये एक विचित्र अपघात झाला आहे. सोलापूर - अक्कलकोट महामार्गावरील कुंभारी टोलनाक्याजवळ बुधवारी सकाळी ट्रक व कारचा विचित्र अपघात झाला. या अपघातात कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. वळसंग पोलिसांच्या सतर्कतेमुळे सहा जणांचे प्राण वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे.

दरम्यान, २६ जानेवारी २०२२ रोजी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास वळसंग पोलिस ठाणे हद्दीतील कुंभारी येथील टोल नाका येथे ट्रक क्रमांक केए ३२ बी १७७७, कार क्रमांक एमएच २५ एएल ४०७०, बलकर ट्रक क्रमांक एमएच १२ सीएक्स ११७१ व ट्रक क्रमांक टीएन ५२ जे ३६७९ यांचा एकामागून एक धडक देऊन अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक अजय हंचाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दासरी, वाळूनजकार, बनकर, गायकवाड, होनमोरे, मोरे, सूर्यवंशी, काळोखे हे घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी क्रेनने कार व ट्रक मधील जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. दरम्यान, अपघातातील मदतीचे कार्य दोन तास सुरू होते.

दरम्यान, ट्रक क्रमांक टीएन ५२ जे ३६७९ मध्ये अडकलेल्या ट्रक ड्रायव्हरला सुखरूप बाहेर काढून उपचाराकरिता हॉस्पिटलला दाखल केले आहे. वेळेत मदतकार्य झाल्याने जीवित हानी टाळणे शक्य झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली. 
–-----------------------------–

अपघातातील जखमींची नावे....
 - सचिन सुरेंद्र खटके (वय ३५), 
- सपना सचिन खटके (२६)
- परमेश्वर शिवाजी सोनटक्के (वय ४०) 
- पल्लवी गिरिष तिवारी (वय २८)
- तीन लहान मुले (सर्व रा .उस्मानाबाद) व 
- ट्रक चालक गणेशन या सर्वांना सुखरूप बाहेर काढून उपचाराकरिता पाठवले.

 

Web Title: Accident News Solapur: accident on Solapur-Akkalkot highway; Four killed in car crash with two trucks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात