Accident again! Woman injured after falling from local train pda | पुन्हा अपघात! लोकलमधून पडून महिला जखमी 

पुन्हा अपघात! लोकलमधून पडून महिला जखमी 

ठळक मुद्देमुंब्रा ठाकूरपाडा येथे राहणाऱ्या कलावती यादव (३५) नामक महिला लोकलमधून पडून जखमी झाली.तेथे प्राथमिक उपचार केल्यावर  डॉक्टरांच्या सल्लानुसार तातडीने त्यांना मुंबईतील सायन रूग्णालयात हलवले आहे.

ठाणे - कळवा-मुंब्रा या रेल्वे स्थानकादरम्यान, मुंब्रा ठाकूरपाडा येथे राहणाऱ्या कलावती यादव (३५) नामक महिला लोकलमधून पडून जखमी झाली. ही घटना बुधवारी घडली असून त्या महिलेच्या डोक्याला गंभीररित्या दुखापत झाल्याने त्यांना तातडीने मुंबईतील सायन रूग्णालयात हलवल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली. 

यादव या नेमक्या कोणत्या लोकलमधून पडल्या हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यातच, अपघातानंतर त्यांना मुंब्रा तिकीट बुकींग निरीक्षक आणि लोहमार्ग पोलिसांनी तातडीने लोकलने ठाणे रेल्वे स्थानकात आणून त्यानंतर त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रूग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यावर  डॉक्टरांच्या सल्लानुसार तातडीने त्यांना मुंबईतील सायन रूग्णालयात हलवले आहे. तर,कलावती या नर्स असल्याचे समजते. त्याबाबत ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अद्यापही काही स्पष्ट केले नाही. तसेच याप्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Accident again! Woman injured after falling from local train pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.