ACB set a trap in Umarkhed sub-treasury office and... | उमरखेड उपकोषागार कार्यालयात एसीबीने रचला सापळा अन्... 

उमरखेड उपकोषागार कार्यालयात एसीबीने रचला सापळा अन्... 

ठळक मुद्दे निवृत्त वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे चार महिन्यांचे वेतन थकीत होते. त्याचे देयक मंजूर करून देण्याकरिता सहा हजार रुपयांची लाच मागण्यात आली.

उमरखेड (यवतमाळ) : निवृत्त वन परिक्षेत्र अधिकाऱ्याला लाच मागितल्या प्रकरणी येथील उपकोषागार अधिकारी अंबादास मेसरे व वनरक्षक गोविंद फुलवरे या दोघांंना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी उपकोषागार कार्यालयात हा सापळा यशस्वी केला. 


निवृत्त वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे चार महिन्यांचे वेतन थकीत होते. त्याचे देयक मंजूर करून देण्याकरिता सहा हजार रुपयांची लाच मागण्यात आली. ही तक्रार प्राप्त होताच सोमवारी सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई एसीबीचे अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक पंजाबराव डोंगरदिवे, पोलीस उपअधीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गजेंद्र क्षीरसागर, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर शेंडे, अनिल राजकुमार, राकेश सवसाकडे, महेश वाकोडे, सचिन भोयर, राहुल गेडाम, संजय कांबळे आदींनी पार पाडली.

Web Title: ACB set a trap in Umarkhed sub-treasury office and...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.