इंजिनिअर विवाहितेवर पतीसह मित्रांचा अत्याचार; चौघांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 11:13 IST2024-10-18T11:12:15+5:302024-10-18T11:13:04+5:30

याबाबत ३० वर्षीय महिलेने बुधवारी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी पीडित महिलेच्या पतीसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. 

Abuse of friends with husband on engineer married; A case has been registered against four | इंजिनिअर विवाहितेवर पतीसह मित्रांचा अत्याचार; चौघांविरोधात गुन्हा दाखल

इंजिनिअर विवाहितेवर पतीसह मित्रांचा अत्याचार; चौघांविरोधात गुन्हा दाखल


पिंपरी : साॅफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साॅफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पतीने तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले, तसेच त्याने तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्यास सांगून त्याचे अश्लील चित्रीकरण केले. पुनावळे येथे सप्टेंबर २०२३ ते ६ एप्रिल २०२४ या कालावधीत ही घटना घडली. 

याबाबत ३० वर्षीय महिलेने बुधवारी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी पीडित महिलेच्या पतीसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. 

पतीने केले चित्रीकरण -
- पीडित महिला आणि तिचा पती साॅफ्टवेअर इंजिनिअर आहे. तिच्या पतीने तीन जणांना वेगवेगळ्या दिवशी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सांगितले, तसेच या अत्याचाराची अश्लील चित्रफीत तयार केली.
- ती चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच पतीने तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्यही केले. यास विरोध केला असता तिला शिवीगाळ केली.
 

Web Title: Abuse of friends with husband on engineer married; A case has been registered against four