२ वर्षांपासून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेने दिला मुलीला जन्म, अहमदनगरमधील भयावह प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 13:20 IST2022-04-10T13:19:37+5:302022-04-10T13:20:05+5:30
माजिद खान साहब खान (रा. पंचपीर चावडी, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे.

२ वर्षांपासून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडितेने दिला मुलीला जन्म, अहमदनगरमधील भयावह प्रकार
अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने गर्भवती राहिलेल्या पीडितेची प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी ( दि.९) उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजिद खान साहब खान (रा. पंचपीर चावडी, अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. आरोपीने शहरात राहत असलेल्या एका १५ वर्षीय मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला. मागील दोन वर्षांपासून आरोपीने पीडितेवर अत्याचार केल्याने तिला गर्भधारणा झाली. त्यानंतर तिची येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूती झाली. तिने एका मुलीला जन्म दिला.
या घटनेने शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलीने कोतवाली पोलीस ठाणे गाठले व आरोपीविरोधात फिर्याद दिली. कोतवाली पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,५, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक एस. के. दुर्गे हे करीत आहेत.