अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 02:07 IST2020-09-01T02:07:25+5:302020-09-01T02:07:49+5:30

खडवली परिसरातील चाळीत आठ दिवसांपूर्वी मुंब्रा येथून इम्रान हुसेन बोंबालाई हा राहायला आला होता. तेथेच राहणारी एक अल्पवयीन मुलगी शनिवारी आपल्या भावंडाबरोबर एकटी असल्याचा फायदा घेत त्याने तिला घरात बोलवून तिच्यावर अत्याचार केला.

Abuse of a minor girl | अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

टिटवाळा : पंखा लावण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीला घरात बोलवून तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना शनिवारी खडवली येथे घडली होती. याप्रकरणी ५३ वर्षीय व्यक्तीला कल्याण तालुका, टिटवाळा पोलिसांनी रविवारी अटक केली. दरम्यान, कल्याण न्यायालयाने त्याला ३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
खडवली परिसरातील चाळीत आठ दिवसांपूर्वी मुंब्रा येथून इम्रान हुसेन बोंबालाई हा राहायला आला होता. तेथेच राहणारी एक अल्पवयीन मुलगी शनिवारी आपल्या भावंडाबरोबर एकटी असल्याचा फायदा घेत त्याने तिला घरात बोलवून तिच्यावर अत्याचार केला. घाबरलेल्या मुलीने हा प्रकार शिकवणी शिक्षिकेस सांगितला. त्यानंतर, तिच्या पालकांनी पोलिसात धाव घेतली. टिटवाळा पोलिसांनी पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Abuse of a minor girl