वॉर्डात रुग्ण नसल्याने मोठा अनर्थ टळला; उल्हासनगर कोविड रुग्णालयाचा ऑक्सिजन पुरवठ्याचा पाईप कापला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 21:13 IST2021-07-30T21:12:26+5:302021-07-30T21:13:16+5:30
The oxygen supply pipe of Ulhasnagar covid Hospital was cut : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वॉर्डात रुग्ण नसल्याने मोठा अनर्थ टळला; उल्हासनगर कोविड रुग्णालयाचा ऑक्सिजन पुरवठ्याचा पाईप कापला
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-४ येथील महापालिका कोविड रुग्णालयाचा ऑक्सिजन पुरवठाचा पाईप अज्ञात व्यक्तीने कापल्याची घटना १७ जुलै रोजी रात्री घडली. पहिल्या मजल्याचा वॉर्डात रुग्ण नसल्याने, मोठा अनर्थ टळला असून याप्रकरणी उशिराने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर महापालिकेचे स्वतःचे रुग्णालय नसल्याने, आरोग्य सुविधेसाठी शासनाच्या मध्यवर्ती व शासकीय प्रसूतीगृह रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. कोरोना काळात महापालिकेने कॅम्प नं-४ येथील शासकीय प्रसूतीगृह रुग्णालय ताब्यात घेऊन रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात केले. रुग्णालयात एकून ६० बेड पैकी दोन बेड व्हेंटलेटर तर इतर ऑक्सिजन बेड आहेत. सद्यस्थितीत शहरात कोरोना रुग्णाची संख्या कमी झाली असून रुग्णालयात जास्तीत जास्त ४ ते ५ रुग्ण असल्याची माहिती महापालिकेचे वैधकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे यांनी दिली. १७ जुलै रोजी रात्री महिला मजल्या वरील वॉर्डला ऑक्सिजन पुरवठा करणारा तांब्याचा पाईप अज्ञात व्यक्तीने कापून टाकला. सुदैवाने वॉर्डात कोविड रुग्ण नसल्याने मोठा अनर्थ टळला. तसेच पाईप कापल्याने रुग्णालयाचे नुकसान झाले आहे.
महापालिका वैधकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे यांना सदर प्रकार समाजल्यावर, धक्का बसला. या खोडसोडवृत्तीचा त्यांनी निषेध व्यक्त केला. त्यांच्या आदेशानुसार अखेर रुग्णालयातील कर्मचारी जितेंद्र माळवे यांच्या तक्रारी वरून विठ्ठलवाडी पोलीसनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकारचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त होत आहे.