फरार सट्टेबाज जेरबंद; २६ लाखांची रोकड जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 16:37 IST2018-10-16T16:37:15+5:302018-10-16T16:37:45+5:30

विविध आंतराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या निलेश छेडा याच्यावर वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. ऑनलाईन सट्टा तो लावत होता.

Absconding bettor arrested; 26 lakh cash seized | फरार सट्टेबाज जेरबंद; २६ लाखांची रोकड जप्त 

फरार सट्टेबाज जेरबंद; २६ लाखांची रोकड जप्त 

पालघर - आंतराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या कुख्यात क्रिकेट सट्टेबाज निलेश छेडा उर्फ योगी याला पालघर पोलिसांच्या विशेष पथकाने सापळा लावून अटक केली आहे. त्याच्याकडून २६ लाखांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.

विविध आंतराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या निलेश छेडा याच्यावर वसईच्या वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. ऑनलाईन सट्टा तो लावत होता. पोलिसांनी छेडाच्या चार साथीदारांना अटक केली होती. मात्र, छेडा फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांच्या पथकाने विशेष मोहिम हाती घेतली होती. विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेद्र शिवदे यांच्या पथकाने त्याला सोमवारी सापाल लावून अटक केली. त्याच्याकडून २६ लाख ५० हजार रूपयांची रोख रक्कम, १४ मोबाईल फोन, दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे.

Web Title: Absconding bettor arrested; 26 lakh cash seized