फरार आरोपी विमानतळावरून ताब्यात; काशिमीरा बेकरी गोळीबार प्रकरणी धडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 06:45 IST2026-03-12T06:45:15+5:302026-03-12T06:45:36+5:30
काशिमीरा बेकरी गोळीबारप्रकरणी मुख्य फरार आरोपी निसार अहमद फजल अहमद शेख ऊर्फ पप्पू पेजर याला बुधवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून काशिमीरा गुन्हे शाखा, युनिट १ ने ताब्यात घेतले.

फरार आरोपी विमानतळावरून ताब्यात; काशिमीरा बेकरी गोळीबार प्रकरणी धडक कारवाई
मिरा रोड : काशिमीरा बेकरी गोळीबारप्रकरणी मुख्य फरार आरोपी निसार अहमद फजल अहमद शेख ऊर्फ पप्पू पेजर याला बुधवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून काशिमीरा गुन्हे शाखा, युनिट १ ने ताब्यात घेतले.
आरोपीविरुद्ध वडाळा ट्रक टर्मिनल पोलिस ठाणे, भायखळा पोलिस ठाणे व काशिमीरा पोलिस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत. काशिमीरा येथील गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त मदन बल्लाळ करीत आहेत. अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्यास २० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
गुन्ह्यानंतर पलायन...
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, तो संघटित गुन्हेगारी टोळीने नियोजित केला असल्याचे निष्पन्न झाले होते. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी निसार अहमद फजल अहमद शेख ऊर्फ पप्पू पेजर हा गुन्हा घडल्यापासून परदेशात पळून गेला होता. मात्र, बुधवारी तो मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्याची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखा, युनिट १ यांना मिळाली असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.