शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

अबब...२ कोटी रुपयांचे हेरॉईन नायजेरियनच्या पोटातून सापडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 21:04 IST

पोटातून हेरॉईन भरलेल्या २३ कॅप्सूल आणि सामानात लपवलेल्या २९ कॅप्सूल सापडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत २.३० कोटी रुपये आहे.

अहमदाबाद - अमली पदार्थांची तस्करी करण्याप्रकरणी अहमदाबाद विमानतळावर एका नायजेरियन तरुणाला अटक करण्यात आली आहे. जोहू अॅलेक्सिस असे त्याचे नाव असून तो दुबईहून अहमदाबाद व अहमदाबादहून मुंबईला निघाला होता. त्याच्या पोटातून हेरॉईन भरलेल्या २३ कॅप्सूल आणि सामानात लपवलेल्या २९ कॅप्सूल सापडल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत २.३० कोटी रुपये आहे.

भारतातील अनेक ठिकाणी अगोदर अनेकदा अशाच पद्धतीने आपण अमली पदार्थांची तस्करी केल्याची कबुली त्याने दिली आहे. यावेळी मात्र आपण तपास अधिकाऱ्यांच्या तावडीत सापडलो असंही त्याने सांगितले. जोहू दुबईहून अहमदाबाद व तेथून मुंबईला जात होता. परंतु, विमानतळावरील सुरक्षा तपासणीच्या वेळी स्कॅनरमधून जाताना त्याच्या पोटात संशयित वस्तू असल्याचे कस्टम अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलीसांनी जोहूला सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी नेले. त्यावेळी डॉ़क्टरांनी त्याला पोट साफ करण्याचे औषध दिले. त्यानंतर त्याच्या शौचात हेरॉईन भरलेल्या २३ कॅप्सूल सापडल्या. नंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाDrugsअमली पदार्थAirportविमानतळPoliceपोलिसGujaratगुजरात