मुलांच्या भांडणादरम्यान पोटावर लाथ लागल्याने महिलेचा गर्भपात

By नितीन पंडित | Updated: April 27, 2023 18:05 IST2023-04-27T18:05:04+5:302023-04-27T18:05:30+5:30

यात आठ महिन्यांच्या गर्भवती असलेल्या संबंधित महिलेचा गर्भपात झाल्याची घटना बुधवारी भिवंडीत घडली.

Abortion of a woman after being kicked in the stomach during a fight between children | मुलांच्या भांडणादरम्यान पोटावर लाथ लागल्याने महिलेचा गर्भपात

मुलांच्या भांडणादरम्यान पोटावर लाथ लागल्याने महिलेचा गर्भपात

 
भिवंडी - लहान मुलांचे भांडण सुरू असताना, नणंदेच्या मुलाला मारू नये म्हणून एक गर्भवती महिला मधे पडली. यावेळी दुसऱ्या मुलाकडून मारहाणीच्या नादात तिच्या पोटावर लाथ लागली. यात आठ महिन्यांच्या गर्भवती असलेल्या संबंधित महिलेचा गर्भपात झाल्याची घटना बुधवारी भिवंडीत घडली.

मेहजबिन चांद अन्सारी (वय २३ वर्ष) ही आठ महिन्याची गर्भवती महिला शांतीनगर फातमा नगर या भागातील झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास आहे. ती घरात असताना तिच्या नंणदेचा दहा वर्षाचा मुलगा हा बाहेर कैफ नावाच्या मुलासोबत खेळत  होता. या दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. त्यावेळी नणंदेचा मुलगा घरात पळत येत गर्भवती महिलेच्या पाठीमागे लपला. त्या ठिकाणी कैफ हा मुलाला मारण्यासाठी आला. दोन्ही मुलांमध्ये झालेले भांडण महिला सोडवित असताना कैफ याने महिलेच्या पोटावर लाथ मारून शिवीगाळ केली. 

या मुळे महिलेच्या पोटावर लाथ मारल्याने वेदना व रक्तस्राव होऊन महिलेचा गर्भपात होऊन तिच्या पोटातली आठ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात कैफ अन्सारी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Abortion of a woman after being kicked in the stomach during a fight between children