Abduction of a young girl in front of her parents; Cinestyle incident in Sakoli taluka | आई-वडिलांसमोरच तरुणीचे अपहरण; साकोली तालुक्यात सिनेस्टाईल घटना

आई-वडिलांसमोरच तरुणीचे अपहरण; साकोली तालुक्यात सिनेस्टाईल घटना

ठळक मुद्देउल्लेखनीय म्हणजे घटनेतील सर्व इसम हे नागपूर येथील असल्याची माहिती आहे.

साकोली ( भंडारा) : तालुक्यातील एका गावात आई-वडिलांच्या समोर एका तरुणीचे चार ते पाच जणांनी घरातूनच अपहरण केल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. घटनेची तक्रार साकोली पोलिसात देताच तपास सुरु झाली दरम्यान पोलिसांनी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. वृत्त लिहीपर्यंत तरुणीचा पत्ता लागला नव्हता.

 साकोली तालुक्यातील एका गावात शनिवारी रात्रीच्या सुमारास चार ते पाच इसम घरात शिरले. यावेळी तरुणीचे आई-वडील व भाऊ घरात उपस्थित होते. त्या तरुणीचे आई-वडिला व भावासमोरच अपहरण केले. याची तक्रार मुलीच्या भावाने रात्रीच साकोली पोलीस ठाण्यात दिली. तक्रार मिळतात पोलिसांचे पथक नागपूरकडे रवाना झाले. पोलिसांनी पाठलाग करीत दोन जणांना ताब्यात घेतले. तसेच या प्रकरणात वापरण्यात आलेले वाहनही ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र अपहरण झालेली तरुणी व अन्य इसमांचा शोध लागलेला नाही. तपास साकोली पोलीस करीत आहेत. उल्लेखनीय म्हणजे घटनेतील सर्व इसम हे नागपूर येथील असल्याची माहिती आहे.

Web Title: Abduction of a young girl in front of her parents; Cinestyle incident in Sakoli taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.