‘आप’च्या मंत्र्याची तुरुंग अधीक्षकांशी बराकीत भेट, ऐटीत गप्पागोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2022 06:18 IST2022-11-27T06:17:28+5:302022-11-27T06:18:33+5:30

दिल्ली भाजपच्या मीडिया युनिटचे प्रमुख हरीश खुराणा यांनी हे सीसीटीव्ही फुटेज शेअर केला आहे. यामुळे पुन्हा दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. 

AAP minister Satyendra Jain meets prison superintendent in Barak | ‘आप’च्या मंत्र्याची तुरुंग अधीक्षकांशी बराकीत भेट, ऐटीत गप्पागोष्टी

‘आप’च्या मंत्र्याची तुरुंग अधीक्षकांशी बराकीत भेट, ऐटीत गप्पागोष्टी

नवी दिल्ली : दिल्लीचे मंत्री व आम आदमी पक्षाचे (आप) नेते सत्येंद्र जैन यांचा एक नवीन व्हिडीओ शनिवारी समोर आला. यात ते तिहार तुरुंग अधीक्षकांची कारागृहामधील आपल्या  बराकीत भेट घेताना दिसत आहेत. आपचे नेते जैन हे तुरुंग अधीक्षकांना भेटत असल्याचा हा कथित व्हिडीओ भाजपच्या काही नेत्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. दिल्ली भाजपच्या मीडिया युनिटचे प्रमुख हरीश खुराणा यांनी हे सीसीटीव्ही फुटेज शेअर केला आहे. यामुळे पुन्हा दिल्लीतील राजकीय वातावरण तापले आहे. 

दावे-प्रतिदावे 
राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असा प्रतिहल्ला चढवत ‘आप’ने  जैन यांची तुरुंगात ‘फिजिओथेरपी’ करण्यात येत होती, असा दावा केला होता. त्यानंतर भाजपने मालिश करणारा बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी होता, असे भाजपने म्हटले होते.

 

Web Title: AAP minister Satyendra Jain meets prison superintendent in Barak